अयोध्येतील राम मंदिराचा कारभार साधू संतांच्या ताब्यात द्या - आखाडा परिषद
त्र्यंबकेश्वर. , 03 जुलै (हिं.स.)। आयोध्यातील श्री राम मंदिर ट्रस्टचा कारभार साधू संतांच्या ताब्यात द्यावा अशा आशयाची चर्चा येथे साधू संतामध्ये सुरू झाली आहे. श्रीराम मंदिर ट्रस्ट मधील कथित घोटाळा प्रकरणी त्रंबकेश्वर येथे आखाडा परिषदेच्या बैठकी
The administration of the


त्र्यंबकेश्वर. , 03 जुलै (हिं.स.)।

आयोध्यातील श्री राम मंदिर ट्रस्टचा कारभार साधू संतांच्या ताब्यात द्यावा अशा आशयाची चर्चा येथे साधू संतामध्ये सुरू झाली आहे.

श्रीराम मंदिर ट्रस्ट मधील कथित घोटाळा प्रकरणी त्रंबकेश्वर येथे आखाडा परिषदेच्या बैठकीत हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणि महाराज यांनी वरील प्रस्ताव मांडला. राम मंदिर घोटाळ्यामुळे झालेली बदनामी भरून काढण्यासाठी साधू संत त्यांनी पुढे यावे असे संकेत येथे मिळत आहे.

त्र्यंबकेश्वर येथे आखाडा परिषदेच्या बैठकीत सिंहस्थ कुंभमेळा तयारी बाबत चर्चा सुरू असताना स्वामी चक्रपाणि महाराज यांनी राम मंदिराचा ट्रस्टचा कारभार आखाडा परिषदे कडे द्यावा . श्री राम मंदिर ट्रस्टची सूत्रे आखाडा परिषदेचे महामंत्री हरीगिरीजी महाराज यांच्याकडे द्यावा असा

प्रस्ताव 30 जून रोजी झालेल्या बैठकीत मांडला आहे.

हिंदू महासभेचा राम मंदिर निर्मिती आणि राम मंदिर लढा सहभाग असून

स्वामी चक्रपाणि महाराज हे

महत्त्वाचे संत आहेत.

या बैठकीला अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्रपुरी महाराज महामंत्री हरीगिरी महाराज कोषाध्यक्ष शंकरानंद सरस्वती महाराज

तसेच आंतरराष्ट्रीय महंत नारायण गिरीमहाराज बडा उदासीन आखाड्याचे महंत रघुमुनिजी महाराज हे उपस्थित होते. मागील कुंभमेळ्यापासून त्रंबकेश्वर मध्ये

आखाडा परिषदेचे महामंत्री हरीगिरी महाराज सहकारी कार्यरत असून त्रंबकेश्वर येथील बैठकीत हे पंचायती बडा उदासीन आखाड्याचे महंत रघुमुनिजी महाराज यांना त्रंबकेश्वर येथील बैठकीत सदस्य बहाल केल्याने आखाडा परिषदेकडे सात आखाडे आजच असल्याचा दावा करण्यात आला आहे.

गेले दोन-तीन दिवस ही चर्चा आता वाढत असून भाविकांमध्ये देखील त्र्यंबकेश्वर येथे कार्यरत असलेल्या साधू संतांनी राम मंदिरासाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande