नाशिक: देवळाली कॅन्टोन्मेंटच्या माजी सीईओवर सीबीआयची कारवाई ; ५.७२ कोटींची बेहिशोबी मालमत्ता उघड
- आई आणि पत्नीचाही सहभाग असल्याचा आरोप - अधिकाऱ्याच्या विरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल नाशिक, 04 जुलै (हिं.स.) : नाशिकच्या देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि २०१२ बॅचचे आयडीईएस अधिकारी अजय कुमार यांच्याविरुद्ध केंद्
सीबीआय लोगो


- आई आणि पत्नीचाही सहभाग असल्याचा आरोप

- अधिकाऱ्याच्या विरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल

नाशिक, 04 जुलै (हिं.स.) : नाशिकच्या देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि २०१२ बॅचचे आयडीईएस अधिकारी अजय कुमार यांच्याविरुद्ध केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) बेहिशोबी मालमत्ता गोळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे केवळ अधिकाऱ्याचाच नव्हे, तर त्यांच्या पत्नी स्मिता कुमारी आणि आई निर्मला देवी यांनाही सहआरोपी करण्यात आले आहे. या दोघांनी अजय कुमार यांना बेकायदेशीर उत्पन्न लपविण्यास, हस्तांतरित करण्यास आणि गुन्ह्यास प्रवृत्त करण्यास मदत केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. सीबीआयच्या तपासानुसार, १ जानेवारी २०१४ ते १३ जून २०२४ या कालावधीत अजय कुमार यांचे एकूण अधिकृत उत्पन्न सुमारे ₹5.04 कोटी इतके होते. मात्र या काळात त्यांचा एकूण खर्च सुमारे ₹5.17 कोटी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांची अधिकृत बचत केवळ ₹13.64 लाख इतकी असल्याचे निष्पन्न झाले.

तपासात आणखी गंभीर बाब उघड झाली असून, या कालावधीत त्यांची संपत्ती केवळ ₹52,428 वरून वाढून सुमारे ₹5.59 कोटी इतकी झाल्याचे आढळले आहे. मात्र या संपत्तीचा कोणताही वैध आर्थिक स्रोत आरोपींना सादर करता आलेला नाही.

सीबीआयच्या आर्थिक विश्लेषणानुसार, एकूण बेहिशोबी मालमत्ता सुमारे ₹5.72 कोटी इतकी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या कलम 109 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande