
पणजी, 04 जुलै (हिं.स.) -
भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी), गोवा येत्या 19 जुलै 2026 रोजी पोंडा येथील राजीव गांधी कलामंदिरात सातवा दीक्षान्त समारंभ आयोजित करणार आहे.
भारत सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार प्रा.अजय कुमार सूद हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, पर्सिस्टंट सिस्टिम्स लि.चे संस्थापक, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ.आनंद देशपांडे हे सन्माननीय अतिथी असतील. 'आयआयटी, गोवा' च्या संचालक मंडळाचे अध्यक्ष आदिल सिराज झैनुलभाई हे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.
यावेळी 144 विद्यार्थ्यांना बी.टेक आणि 22 विद्यार्थ्यांना एम.टेक पदवी प्रदान केली जाणार आहे, तर 22 जणांना पीएचडी प्रदान केली जाणार आहे. आपापले शिक्षणक्रम परिश्रमपूर्वक पूर्ण केल्यानंतर या सर्वांचा गौरव केला जाणार आहे. या सोहळ्यात पदवीदान आणि अत्यंत सन्मानाच्या विद्यार्थी गुणगौरव पुरस्कारांचे सादरीकरणदेखील होणार आहे.
या कार्यक्रमात आयआयटी, गोवा चे संचालक प्रा.धीरेन्द्र कट्टी, शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील संस्थेचे शिक्षण तसेच संशोधन क्षेत्रातील यश, आणि उद्योगांशी सहयोग याविषयी एक अहवाल सादर करणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी