यूजरनेम फीचरबाबत सरकारने टेलिग्राम आणि सिग्नलकडूनही मागवले स्पष्टीकरण
नवी दिल्ली, 04 जुलै (हिं.स.)। केंद्र सरकारने मेसेजिंग प्लॅटफॉर्म टेलिग्राम आणि सिग्नलच्या यूजरनेम फीचरबाबत फसवणूक आणि बनावट ओळखीच्या शक्यतांवर चिंता व्यक्त केली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने दोन्ही कंपन्यांना नोटीस बजावत या
INDIA Government Telegram Signal Username iPhone


नवी दिल्ली, 04 जुलै (हिं.स.)। केंद्र सरकारने मेसेजिंग प्लॅटफॉर्म टेलिग्राम आणि सिग्नलच्या यूजरनेम फीचरबाबत फसवणूक आणि बनावट ओळखीच्या शक्यतांवर चिंता व्यक्त केली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने दोन्ही कंपन्यांना नोटीस बजावत या फीचरशी संबंधित सुरक्षा उपाययोजना आणि त्याची आवश्यकता याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, मंत्रालयाने टेलिग्रामला विचारले आहे की त्यांचे यूजरनेम फीचर सुरू ठेवण्याची आवश्यकता काय आहे आणि त्यासंदर्भातील संभाव्य सायबर धोके रोखण्यासाठी कंपनीने कोणत्या उपाययोजना केल्या आहेत. त्याचप्रमाणे सिग्नलकडूनही यासंदर्भात सविस्तर माहिती मागवण्यात आली आहे.

हे पाऊल अशा वेळी उचलण्यात आले आहे, जेव्हा केंद्र सरकारने नुकतेच मेटाला भारतात व्हॉट्सअॅपचे नवीन यूजरनेम फीचर सध्या लॉन्च करू नये, असे सांगितले आहे. सरकारने कंपनीला तीन दिवसांच्या आत या फीचरशी संबंधित सविस्तर माहिती सादर करण्यास आणि चर्चा पूर्ण होईपर्यंत ते लागू न करण्याचे निर्देश दिले आहेत.

व्हॉट्सअॅपने आपल्या उत्तरात म्हटले आहे की, यूजरनेम फीचरमध्ये आधीपासूनच असे सुरक्षा उपाय समाविष्ट करण्यात आले आहेत, जे बनावट ओळख आणि ऑनलाइन फसवणुकीचा धोका कमी करण्यासाठी तयार करण्यात आले आहेत. या फीचरअंतर्गत वापरकर्ते मोबाईल क्रमांक शेअर न करता केवळ युनिक यूजरनेमच्या माध्यमातून एकमेकांशी संपर्क साधू शकतील.

दरम्यान, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस. कृष्णन यांनी सांगितले की, सरकार ॲपलच्या अद्याप लॉन्च न झालेल्या आयफोन 18 प्रोशी संबंधित कथित डेटा लीक प्रकरणाचीही चौकशी करत आहे. त्यांनी सांगितले की, टाटा इलेक्ट्रॉनिक्समधून कथितरित्या चोरी झालेल्या दस्तऐवजांच्या प्रकरणाची चौकशी सुरू असून संबंधित तथ्यांची पडताळणी केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande