पंतप्रधानांनी जोधपूर विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे केले उद्घाटन
- 480 कोटींच्या खर्चातून विकसित नवीन टर्मिनल 23 हजार चौ.मी. क्षेत्रात पसरले जयपूर, 04 जुलै (हिं.स.)। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी जोधपूर विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन केले. या प्रसंगी त्यांनी सुधारित उडान योजनेचाही शुभारंभ के
PM Inaugurates New Terminal Building Jodhpur Airport


PM Inaugurates New Terminal Building Jodhpur Airport


- 480 कोटींच्या खर्चातून विकसित नवीन टर्मिनल 23 हजार चौ.मी. क्षेत्रात पसरले

जयपूर, 04 जुलै (हिं.स.)। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी जोधपूर विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन केले. या प्रसंगी त्यांनी सुधारित उडान योजनेचाही शुभारंभ केला. कार्यक्रमात राज्यपाल हरिभाऊ किसनराव बागडे, मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापु राममोहन नायडू, केंद्रीय संस्कृती व पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोल, मुख्य सचिव वी. श्रीनिवास तसेच इतर लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.

480 कोटी रुपयांच्या खर्चातून विकसित जोधपूर विमानतळाचे नवीन टर्मिनल 23 हजार चौ.मी. पेक्षा अधिक क्षेत्रात पसरले आहे आणि त्याची वार्षिक प्रवासी क्षमता 20 लाख आहे. राजस्थानच्या समृद्ध वारशातून प्रेरित वास्तुकलेने हे टर्मिनल बांधले गेले असून ते अत्याधुनिक प्रवासी सुविधांनी सुसज्ज आहे. तसेच ऊर्जा कार्यक्षमता, जलसंवर्धन आणि हरित इमारत बांधकाम पद्धती यांसारख्या वैशिष्ट्यांसह शाश्वत विकास हे या टर्मिनलच्या रचनेचा अविभाज्य भाग आहे. नवीन टर्मिनलच्या उद्घाटनामुळे उत्तम हवाई जोडणीसह पश्चिम राजस्थानमध्ये पर्यटन, व्यापार आणि रोजगाराच्या संधी वाढतील.

‘उडे देश का आम नागरिक’ या दृष्टिकोनाला बळकटी देण्यासाठी पंतप्रधानांनी ‘उडे देश का आम नागरिक’ या दृष्टिकोनाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या सुधारित उडान योजनेत प्रादेशिक हवाई जोडणीवर विशेष लक्ष दिले जात आहे. या योजनेअंतर्गत 28 हजार 840 कोटी रुपयांच्या वाटपातून पुढील 10 वर्षांत विमानवाहतूक आधारित विकासाला गती दिली जाईल. यामुळे देशभरात व्यापक आणि शाश्वत जोडणी सुनिश्चित होईल तसेच भारतीय विमानवाहतूक क्षेत्राला मोठी चालना मिळेल.

100 विमानतळांच्या विकासावर भर

सुधारित उडान योजनेअंतर्गत देशभरात विमानवाहतूक पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी सध्या वापरात नसलेल्या धावपट्ट्यांमधून 100 विमानतळांच्या विकासावर विशेष भर देण्यात आला आहे. तसेच दुर्गम आणि अवघड भागांमध्ये पोहोचण्याच्या अडचणी दूर करण्यासाठी या योजनेत 200 आधुनिक हेलिपॅड विकसित करण्याचेही प्रस्तावित आहे. या योजनेअंतर्गत विमान कंपन्यांना 10 हजार कोटी रुपयांहून अधिक व्हायबिलिटी गॅप फंडिंग सहाय्य सुरू ठेवले जाईल, ज्यामुळे प्रादेशिक संचालनाची सातत्यता सुनिश्चित होऊ शकेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande