
- पात्र मतदारांना प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन
नवी दिल्ली, 04 जुलै (हिं.स.)। उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष सघन पुनरावलोकन (एसआयआर) अंतर्गत आपला पूर्ण भरलेला गणना फॉर्म सादर केला. दिल्लीचे मुख्य निवडणूक अधिकारी अशोक कुमार आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी दिल्लीतील सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष सघन पुनरावलोकनाचा भाग म्हणून उपराष्ट्रपती भवन येथे गणना प्रक्रिया सुलभ केली.
यावेळी उपराष्ट्रपतींनी सर्व पात्र मतदारांना या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. अचूक आणि अद्ययावत मतदार यादी राखणे हे भारताच्या सशक्त लोकशाहीला अधिक बळकटी देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष सघन पुनरावलोकन यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी निवडणूक यंत्रणेला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule