कर्नाटकमध्ये भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू, 2 जखमी
यल्लापूर (कर्नाटक) 09 जुलै (हि.स.) : उत्तर कन्नड जिल्ह्यातील यल्लापूर तालुक्यात अरबैल घाटाजवळ गुरुवारी पहाटे मल्टी-युटिलिटी वाहन (एमयूव्ही) आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात धारवाड येथील 7 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आ
कर्नाटकमधील भीषण अपघाताचे छायाचित्र


यल्लापूर (कर्नाटक) 09 जुलै (हि.स.) : उत्तर कन्नड जिल्ह्यातील यल्लापूर तालुक्यात अरबैल घाटाजवळ गुरुवारी पहाटे मल्टी-युटिलिटी वाहन (एमयूव्ही) आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात धारवाड येथील 7 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

यासंदर्भातील माहितीनुसार अपघातात मृत्यूमुखी पडलेले सर्वजण धारवाडचे रहिवासी असून, बुधवारी (8 जुलै) रात्री ते एमयूव्हीद्वारे धर्मस्थळ आणि इतर धार्मिक स्थळांच्या दर्शनासाठी निघाले होते. पहाटेच्या सुमारास अरबैल घाट परिसरात त्यांच्या वाहनाची ट्रकशी जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की एमयूव्हीचा पूर्णपणे चुराडा झाला. यामध्ये कारमधील 7 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये वाहनचालक संजय अंगडी , बसवराज , अभिषेक ईश्वर, अक्षय, अभिषेक आणि मंजूनाथ चुलकी यांचा समावेश आहे. सातव्या मृत व्यक्तीची ओळख अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेली नाही.दुर्गाप्पा मडिवाळ, चन्नबसय्या संपगाव आणि सचिन हे या अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जाते.

अपघाताची माहिती मिळताच यल्लापूर पोलिस आणि महामार्ग पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात हलवून बचावकार्य सुरू केले. वाहनाचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाल्यामुळे मृतदेह बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाला मोठी कसरत करावी लागली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अपघातातून बचावलेल्या शिवराज यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलम 281 (सार्वजनिक रस्त्यावर निष्काळजीपणे वाहन चालविणे), कलम 125(2) (इतरांच्या जीवितास किंवा वैयक्तिक सुरक्षिततेस गंभीर धोका निर्माण करणे) आणि कलम 106(1) (निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरणे) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande