ऑपरेशन सिंदूर’चा डंका जगभर, मेलबर्नमध्ये ३० हजार भारतीयांसमोर पंतप्रधान मोदींचा ठाम संदेश
नवी दिल्ली , 09 जुलै (हिं.स.)।पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत. गुरुवारी त्यांनी मेलबर्न येथे भारतीय समुदायाला संबोधित केले. या भव्य कार्यक्रमात सुमारे ३० हजार भारतीय सहभागी झाले होते. भारतीय समुदायाशी संवाद साध
ऑपरेशन सिंदूर’ची गूंज जगभर, मेलबर्नमध्ये ३० हजार भारतीयांसमोर पंतप्रधान मोदींचा ठाम संदेश


नवी दिल्ली , 09 जुलै (हिं.स.)।पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत. गुरुवारी त्यांनी मेलबर्न येथे भारतीय समुदायाला संबोधित केले. या भव्य कार्यक्रमात सुमारे ३० हजार भारतीय सहभागी झाले होते. भारतीय समुदायाशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा एकदा ‘ऑपरेशन सिंदूर’चा उल्लेख केला.

पंतप्रधान मोदी म्हणाले, “ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवादी तळांवर झालेल्या स्फोटांचा आवाज संपूर्ण जगाने ऐकला. ऑपरेशन सिंदूरदरम्यानचा डेमो तुम्ही पाहिलाच असेल. स्फोट शेजारी देशात होत होते, पण त्यांची दणदणाट जगभर ऐकू येत होती. दहशतवादी छावण्यांवर झालेल्या या कठोर प्रहाराचा तुम्हाला अभिमान वाटला की नाही? भारत इथेच थांबू इच्छित नाही. भारत म्हणत आहे – ‘ग्रो मोअर, ग्रो मोअर’.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, “आपण भारतीय असे आहोत की जसे दुधात साखर मिसळली की ते अधिक गोड होते. त्याचप्रमाणे आपण भारतीय जगभर प्रेम आणि आपुलकीची गोडी पसरवत असतो. घरात येणारे दूध ऑस्ट्रेलियाचे असले तरी त्यापासून बनणारा चहा भारतीयच असतो.”ते म्हणाले, “भारतामध्ये सध्या ‘भजन क्लबिंग’चा नवा ट्रेंड सुरू झाला आहे. आपली जनरेशन झेड (Gen Z) ही परंपरा पुढे नेत आहे. ऑस्ट्रेलियामध्येही तुमचे आठवड्याचे शेवटचे दिवस श्रद्धा आणि अध्यात्माने परिपूर्ण असतात, असे मी ऐकले आहे. कुठे कोणाच्या घरी भगवान सत्यनारायणाची कथा असते, कुठे गुरुद्वारात अरदास असते, कुठे मुले भांगडा सादर करत असतात, तर कुठे भरतनाट्यमचा कार्यक्रम होत असतो. काही ठिकाणी क्रिकेट स्पर्धाही सुरू असतात.”

व्हेनेझुएलामधील भूकंपानंतर भारतीय सैन्याने राबवलेल्या ‘ऑपरेशन अमिस्ताद’चा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “भारत नेहमीच आपत्तीच्या काळात मदतीसाठी पुढे येतो. आम्ही मदत करताना नागरिकांचा पासपोर्ट पाहत नाही. आज संपूर्ण जग भारतावर विश्वास ठेवते.” त्यांनी तुर्किये आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपाच्या वेळी भारताने दिलेल्या मदतीचाही उल्लेख केला. तसेच, क्रीडा क्षेत्रातील भारताच्या योगदानावरही त्यांनी प्रकाश टाकला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “मला आनंद आहे की शिक्षण, कौशल्य विकास आणि नवोपक्रम (इनोव्हेशन) या क्षेत्रांमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील संबंध अधिक दृढ आणि मजबूत होत आहेत. आज हजारो भारतीय विद्यार्थी ऑस्ट्रेलियामध्ये शिक्षण घेत आहेत. तसेच, ऑस्ट्रेलियातील विद्यापीठेही आता भारतात आपले कॅम्पस सुरू करत आहेत. डीकिन विद्यापीठ आणि वोलोंगोंग विद्यापीठ यांचे कॅम्पस सुरू झाले आहेत आणि इतर ऑस्ट्रेलियन विद्यापीठेही या दिशेने पुढे जात आहेत. हे केवळ नवीन कॅम्पस उघडण्यापुरते मर्यादित नाही, तर जगाला कुशल आणि नाविन्यपूर्ण प्रतिभा देणारे जागतिक नेते घडविण्याचे हे एक महत्त्वपूर्ण अभियान आहे.”

२०१४ मधील आपल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची आठवण करून देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्या वेळी तब्बल २८ वर्षांनंतर एखाद्या भारतीय पंतप्रधानाने ऑस्ट्रेलियाला भेट दिली होती. ते म्हणाले, “त्या वेळी मी सांगितले होते की पुढच्या वेळी भारताच्या पंतप्रधानांच्या भेटीसाठी लोकांना पुन्हा २८ वर्षे वाट पाहावी लागणार नाही.”ते पुढे म्हणाले की, गेल्या १२ वर्षांत हा त्यांचा ऑस्ट्रेलियाचा तिसरा दौरा असून ही एक प्रकारची ‘हॅटट्रिक’च आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील संबंध किती वेगाने आणि किती मजबूत झाले आहेत, याचे हे द्योतक आहे.

यापूर्वी व्हिक्टोरिया राज्याच्या प्रीमियर जॅसिंटा ॲलन यांनी पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केले. त्या म्हणाल्या, “व्हिक्टोरिया भारतीयांचा सन्मान करतो आणि त्यांच्या मूल्यांचा आदर करतो. आमच्यासाठी भारत हा केवळ व्यापाराचा भागीदार नसून विश्वासाचे प्रतीक आहे.” त्यांनी याच मंचावरून भारतातील नागरिकांना व्हिक्टोरियाला भेट देण्याचे आमंत्रणही दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande