पंतप्रधान मोदींकडून कर्नाटकमधील अपघाताबद्दल शोक व्यक्त
नवी दिल्ली, ९ जुलै (हिं.स.)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यातील कारवार येथे झालेल्या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी शोकाकुल कुटुंबियांप्रति सहानुभूती व्यक्त केली आणि जखमींच्या शीघ्र आरोग्यासाठी प्रार्थना केली. पंत
पंतप्रधान नरेंद्र मोदी


नवी दिल्ली, ९ जुलै (हिं.स.)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यातील कारवार येथे झालेल्या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी शोकाकुल कुटुंबियांप्रति सहानुभूती व्यक्त केली आणि जखमींच्या शीघ्र आरोग्यासाठी प्रार्थना केली.

पंतप्रधान मोदींनी गुरुवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर सांगितले की, कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यातील कारवार येथे झालेला अपघात अत्यंत दुःखद आहे. या कठीण काळात मृतांच्या कुटुंबीयांप्रति त्यांच्या संवेदना आहेत. त्यांनी अपघातातील जखमींच्या शीघ्र आरोग्यासाठी प्रार्थनाही केली.

कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यातील यल्लापूर तालुक्यात, अरबैल घाटातील बलगरजवळ एक क्रूझर वाहन आणि ट्रक यांच्यात झालेल्या समोरासमोरच्या धडकेत सहा जणांचा मृत्यू झाला आणि चार जण गंभीर जखमी झाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande