बीसीसीआयने रोहित शर्माच्या एकदिवसीय क्रिकेटमधील भविष्याबाबत स्पष्टता द्यावी - अजिंक्य रहाणे
नवी दिल्ली, 10 ऑगस्ट (हिं.स.)२०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकातील रोहित शर्माच्या भविष्याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने बीसीसीआयकडे एक महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. एका मुलाखतीत रहाणेने स्पष्टपण
अजिंक्य रहाणे


नवी दिल्ली, 10 ऑगस्ट (हिं.स.)२०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकातील रोहित शर्माच्या भविष्याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने बीसीसीआयकडे एक महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. एका मुलाखतीत रहाणेने स्पष्टपणे सांगितले की, रोहितला आताच कळवले पाहिजे की तो २०२७ च्या विश्वचषकाचा भाग असेल. मला वाटते की रोहित शर्माला हे सांगणे महत्त्वाचे आहे की तो २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकात खेळेल. गेल्या काही वर्षांतील त्याचे योगदान पाहा. ते विलक्षण राहिले आहे. विश्वचषकासाठी अशा क्रिकेटपटूंच्या अनुभवाची गरज असते. यावर कोणतीही चर्चा व्हायला नको. तुम्ही प्रत्येक मालिकेनुसार पाहू शकत नाही, कारण तो एक महान क्रिकेटपटू आहे.

गेल्या वर्षी रोहित शर्माच्याच नेतृत्वाखाली भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. सलामीवीर आणि कर्णधार म्हणून त्याने संघाचे नेतृत्व केले. आकडेवारीसुद्धा रोहितच्या बाजूने आहे. त्याने २८८ एकदिवसीय सामन्यांमधील २८० डावांमध्ये ४८.९५ च्या सरासरीने ११,८९५ धावा केल्या आहेत, ज्यात ३४ शतकांचा समावेश आहे. केवळ २०२५ मध्येच, त्याने १४ सामन्यांमध्ये ५०.०० च्या सरासरीने आणि १०० पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने ६५० धावा केल्या.

रहाणेचा विश्वास आहे की विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत अनुभव ही एक मोठी ताकद आहे. रोहित २०१९ आणि २०२३ च्या विश्वचषकांमध्ये खेळला होता. त्याने २०२७ च्या विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या. त्यामुळे, २०२७ मध्ये मायदेशात होणाऱ्या विश्वचषकात त्याची उपस्थिती संघासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. रहाणेच्या वक्तव्यानंतर, बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापन या प्रकरणी काय भूमिका घेतात हे पाहणे बाकी आहे.

२०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकासंदर्भात रोहित शर्माच्या निवृत्तीबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, या चर्चांच्या दरम्यान, बीसीसीआयने स्पष्ट केले आहे की संघ व्यवस्थापन अजूनही या दोन्ही अनुभवी क्रिकेटपटूंना आपल्या योजनांसाठी महत्त्वाचे मानते. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी याबद्दल उघडपणे भाष्य केले. २०२७ च्या विश्वचषकाच्या योजनांमध्ये रोहित आणि विराट आहेत का किंवा ते निवृत्त होऊ शकतात का, असे विचारले असता ते म्हणाले, विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघेही २०२७ च्या विश्वचषकासाठीच्या आमच्या योजनांचे महत्त्वाचे भाग आहेत. त्यांचा अनुभव संघासाठी अमूल्य ठरेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande