नाशिक : बनावट कागदपत्रांद्वारे वेतन निश्चिती प्रकरणी गुजर शाळेच्या 11 शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल
शालार्थ आयडी प्रकरणाचा तपास एस आय टी करत असतानाच शाळेने उचललं पाऊल नाशिक, 10 ऑगस्ट (हिं.स.)। शिक्षकांच्या शालार्थ आयडी घोटाळ्याचा विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) तपास सुरु असतानाच नाशिकच्या शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडवणारी आणखी एक घटना उघडकीस आली आह
नाशिक : बनावट कागदपत्रांद्वारे वेतन निश्चिती प्रकरणी गुजर शाळेच्या 11 शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल


शालार्थ आयडी प्रकरणाचा तपास एस आय टी करत असतानाच शाळेने उचललं पाऊल

नाशिक, 10 ऑगस्ट (हिं.स.)। शिक्षकांच्या शालार्थ आयडी घोटाळ्याचा विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) तपास सुरु असतानाच नाशिकच्या शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडवणारी आणखी एक घटना उघडकीस आली आहे. देवळाली कॅम्प भागातील नामांकित डॉ. सुभाष गुजर हायस्कूलमध्ये बनावट व खोटी कागदपत्रे तयार करून वेतन निश्चिती करत संस्था आणि शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी तब्बल ११ शिक्षकांविरुद्ध देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शंकर एज्युकेशन सोसायटीचे सचिव रतन राजलदास चावला (वय ५९, रा. ५ ग्रीनफिल्ड, २९ वडनेर रोड, देवळाली कॅम्प) यांच्या फिर्यादीनुसार, डॉ. सुभाष गुजर हायस्कूल (सिलेक्शन कॉर्नर, पेट्रोलपंपासमोर, देवळाली कॅम्प) येथे सन २००१ ते २५ मार्च २०२२ या कालावधीत हा गैरप्रकार घडला. संबंधित ११ संशयितांनी संस्थेमध्ये वेतन निश्चितीसाठी जिल्हा परिषद नाशिक तसेच नाशिकच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयात यांच्याकडे कोणताही अधिकृत पत्रव्यवहार अथवा मान्यता ठराव सादर केलेला नव्हता.

दरम्यान, असे असतानाही परस्पर खोटी व बनावट कागदपत्रे तयार करून वेतन निश्चिती पदरात पाडून घेतली. या प्रकरणातून संस्था आणि राज्य शासनाची आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. फिर्यादीवरून देवळाली कॅम्प पोलिसांनी फसवणुकीसह गुन्हेगारी कटाचा गुन्हा नोंदवला आहे. उपनिरीक्षक पाडेकर तपास करत आहेत.

चौकट

गुन्हा दाखल झालेले ११ संशयित शिक्षक

१) पूनम समीर मुखर्जी (रा. हिरामय हाउस देवळाली कॅम्प)

२) प्रज्ञा नितीन राजे (रा. शांती प्रसाद, हॉस्पिटलजवळ, नाशिक रोड)

३) मनमोहन श्याम हेमनानी (रा. हौसेन रोड, नाशिक)

४) लक्ष्मण यशवंत मुसळे (रा. भैरवनाथ नगर, संसरी गाव, नाशिक)

५) कु. विश्वंभरी पंजूमल दौलतानी (रा. साई समर्थ एन्क्लेव्ह, एसबीआय बँकेच्यामागे, देवळाली कॅम्प)

६ ) प्रियंका विजय आहुजा (रा. संजय सोसायटी, लॅम रोड, विहितगाव)

७) कु. सविता अर्जुनसिंग अडवाणी (रा. स्पेरींग टाईम मेडो, हरीकिशन नगर, देवळाली कॅम्प)

८) भाग्यश्री संजय हिरे (रा. तुळसी बी, श्रीकृष्ण नगर, बिटको कॉलेजच्यामागे, नाशिक रोड)

९) शरयू प्रकाश कुलकर्णी (रा. आशर इस्टेट, उपनगर, नाशिक)

१०) शोभा तानाजी ढुमणे (रा. सुपर रेसीडन्सी, माणेकशा नगर, द्वारका, नाशिक)

११) सुजाता श्रीकृष्ण ठाकूर (रा. १०२३, जैन व्हिला, देवळाली कॅम्प)

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande