बीड - पोस्ट ऑफिसमध्ये पैसे भरायला आलेल्या वृद्ध महिलेची ५० हजारांची पिशवी हिसकावली
बीड, 12 ऑगस्ट (हिं.स.)। परळी येथील पोस्ट ऑफिसमध्ये पैसे टाकण्यासाठी गेलेल्या ७० वर्षीय वृद्ध महिलेला धक्का देऊन तिची पिशवी हिसकावून घेऊन ५० हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी संभाजीनगर पोलिस ठाण्यात एक अनोळखी महिलेविरुद
फसवणूक


बीड, 12 ऑगस्ट (हिं.स.)। परळी येथील पोस्ट ऑफिसमध्ये पैसे टाकण्यासाठी गेलेल्या ७० वर्षीय वृद्ध महिलेला धक्का देऊन तिची पिशवी हिसकावून घेऊन ५० हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी संभाजीनगर पोलिस ठाण्यात एक अनोळखी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बँक कॉलनी, परळी वैजनाथ येथील पद्मिनी संदीपान सूर्यवंशी (वय ७०) या वयोवृद्ध असून, पोस्ट ऑफिस, परळी वैजनाथ येथे पैसे टाकण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्या जवळच असलेल्या अंदाजे ६५ वर्षीय अनोळखी महिलेने त्यांच्या पाठीमागून येत धक्का दिला. या गोंधळाचा फायदा घेत त्यांच्या पिशवीतील ५० हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनेनंतर या वृद्ध महिलेने संभाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गु.र.नं. १८९/२०२६, कलम ३०३(२) बी.एन.एस. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक पुजरवाड यांच्याकडे सोपविण्यात आला असून, पोलिसांकडून संशयित महिलेचा शोध घेण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande