अमरावती - वडाळीत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; परिसरात खळबळ
अमरावती, 12 ऑगस्ट, (हिं.स.)। वडाळी परिसरातील गुरुकृपा कॉलनी येथे पोलीस हेडकॉन्स्टेबल अमित खंडारे यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले
वडाळीत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; परिसरात खळबळ


अमरावती, 12 ऑगस्ट, (हिं.स.)। वडाळी परिसरातील गुरुकृपा कॉलनी येथे पोलीस हेडकॉन्स्टेबल अमित खंडारे यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

अमित खंडारे हे सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात हेडकॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. १९ जून रोजी त्यांची वाहतूक शाखेतून सिटी कोतवाली येथे बदली झाली होती. त्यानंतर २२ जून रोजी पोलीस मुख्यालयात रिफ्रेश कोर्ससाठी त्यांना रवाना करण्यात आले होते.खंडारे हे गुरुकृपा कॉलनीतील घराच्या पहिल्या मजल्यावर पत्नी आणि दोन मुलांसह राहत होते. त्यांची पत्नी शिक्षिका असून, आज सकाळी साडेसातच्या सुमारास त्या मुलांसह शाळेसाठी घराबाहेर पडल्या. पत्नी व मुले घराबाहेर गेल्यानंतर अमित खंडारे यांनी आत्मघाती पाऊल उचलल्याचे समोर आले.घटनेची माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आत्महत्येचे नेमके कारण काय, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोलिस दलातही खळबळ उडाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande