कोलंबियामध्ये ७.४ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप
बोगोटा, 10 ऑगस्ट (हिं.स.)।दक्षिण अमेरिकेतील कोलंबियामध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. ७.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या या भूकंपामुळे अनेक इमारतींचे नुकसान झाले असून, काही जण जखमी झाल्याचीही माहिती आहे. भूकंपाच्या जोरदार धक्क्यांमुळे नागरिकांना
earthquake in Colombia


बोगोटा, 10 ऑगस्ट (हिं.स.)।दक्षिण अमेरिकेतील कोलंबियामध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. ७.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या या भूकंपामुळे अनेक इमारतींचे नुकसान झाले असून, काही जण जखमी झाल्याचीही माहिती आहे.

भूकंपाच्या जोरदार धक्क्यांमुळे नागरिकांना घरे आणि इमारती रिकाम्या करून सुरक्षित ठिकाणी जावे लागले. भूकंपाचे धक्के कोलंबियाची राजधानी बोगोटासह शेजारील व्हेनेझुएला आणि इक्वाडोरपर्यंत जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू बोगोटापासून सुमारे ४०० किलोमीटर पश्चिमेला असलेल्या सॅन होसे डेल पाल्मारजवळ होता. कोलंबियाच्या नॅशनल युनिट फॉर डिसास्टर रिस्क मॅनेजमेंटनुसार (यूएनजीआरडी), भूकंपाची तीव्रता ७.४ होती आणि तो जमिनीखाली सुमारे ७९ किलोमीटर खोलीवर झाला.

चोको प्रांताच्या गव्हर्नर नुबिया कॅरोलिना कॉर्डोबा-क्युरी यांनी सांगितले की, प्रांतीय राजधानी क्विब्डो येथे काही नागरिक जखमी झाले असून अनेक इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या प्रशासनाकडून नुकसानीचा आढावा घेतला जात आहे.भूकंपानंतर आणखी काही धक्के जाणवण्याची शक्यता असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. गव्हर्नर नुबिया कॅरोलिना कॉर्डोबा-क्युरी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत सांगितले की, चोको प्रांतात नुकताच मोठा भूकंप झाला आहे. आता भूकंपानंतर येणाऱ्या आफ्टरशॉक्सची चिंता आहे.

भूकंपाचा केंद्रबिंदू सॅन होसे डेल पाल्मारजवळ असला तरी राजधानी क्विब्डोमध्ये नागरिक जखमी झाले असून इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. यूएनजीआरडी ने सांगितले की, नुकसानीची व्याप्ती निश्चित करण्यासाठी स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande