दिल्ली कॅपिटल्सचा क्रिकेटपटू अभिषेक पोरेलला अटक
कोलकाता, 11 ऑगस्ट (हिं.स.) इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या बंगाली क्रिकेटपटू अभिषेक पोरेलला एका वैद्यकीय विद्यार्थिनीने दाखल केलेल्या फौजदारी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. तिने त्याच्यावर बलात्कार, गुन्हेगारी धमकी आ
अभिषेक पोरेल


कोलकाता, 11 ऑगस्ट (हिं.स.) इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या बंगाली क्रिकेटपटू अभिषेक पोरेलला एका वैद्यकीय विद्यार्थिनीने दाखल केलेल्या फौजदारी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. तिने त्याच्यावर बलात्कार, गुन्हेगारी धमकी आणि इतर गंभीर गुन्ह्यांचा आरोप केला होता.

हुगळी ग्रामीण पोलीस अधीक्षक कुंवर भूषण सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी क्रिकेटपटूला इमामी सिटीमधून अटक केली, जे दमदम पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. यापूर्वी जूनमध्ये, पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केली होती की, क्रिकेटपटूने लग्नाचे खोटे आश्वासन देऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आणि तिला मारहाण करून धमकावले.

त्यानंतर कोलकाता उच्च न्यायालयाने पोलिसांना या प्रकरणात क्रिकेटपटूला अटक करण्याचे निर्देश दिले. यापूर्वी इंडिया 'अ' संघासोबत यूके आणि ऑस्ट्रेलियाचा दौरा केलेल्या पोरेलने यापूर्वी सर्व आरोप फेटाळले होते. तक्रारीनुसार, महिलेने आरोप केला आहे की, ती आणि पोरेल गेल्या तीन वर्षांपासून नात्यात होते आणि गेल्या वर्षी त्यांच्यात मतभेद निर्माण झाले, ज्यानंतर त्या क्रिकेटपटूने कथितरित्या तिच्याशी संबंध तोडले. तिने असाही आरोप केला आहे की, पोरेलने तिच्याशी लग्न करण्याचे वचन दिले होते, पम आता तो तसे करण्यास तयार नाही.

आपल्या तक्रारीत, महिलेने आरोप केला आहे की, पोरेलने लग्नाचे वचन देऊन तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आणि त्याच्यावर मारहाण व गुन्हेगारी धमकी दिल्याचाही आरोप केला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, आम्हाला तक्रार मिळाली असून आम्ही तपास सुरू केला आहे.

अभिषेक पोरेल, २०२३ पासून इंडियन प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करत आहे. गेल्या हंगामात त्याने दिल्ली कॅपिटल्ससाठी चार डावांत १०८ धावा केल्या होत्या. त्याने २०२१-२२ हंगामात बंगालकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि आतापर्यंत ३२ प्रथम श्रेणी व २३ लिस्ट ए सामने खेळले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande