
नंदुरबार , 11 ऑगस्ट (हिं.स.) कथित ऑडीओ क्लिपमध्ये जातीवाचक तसेच शिवराळ भाषेचा वापर केल्याप्रकरणी भाजपाचे तत्कालीन उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय वसंतलाल चौधरी यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायायलीन कोठडी सुनावली आहे.
विजय वसंत चौधरी यांच्या कथित ऑडीओ क्लिपमध्ये शिवराळ भाषेचा वापर तसेच अश्लील शब्दप्रयोग केल्याप्रकरणी रोहन शरद गावित यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी त्यांना दि. ६ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास धुळे येथून अटक करण्यात आली होती. त्यांना सेशन कोर्टात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्या.काळे यांनी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर