शेतीच्या वादातून पत्नीची हत्या ; पती दोन तासांत पोलिसांच्या ताब्यात
धुळे, 11 ऑगस्ट (हिं.स.) : साक्री तालुक्यातील वाकी शिवारातील शेतात महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी अवघ्या दोन
शेतीच्या वादातून पत्नीची हत्या ; पती दोन तासांत पोलिसांच्या ताब्यात


धुळे, 11 ऑगस्ट (हिं.स.) : साक्री तालुक्यातील वाकी शिवारातील शेतात महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी अवघ्या दोन तासांत संशयित आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. वाकी गावाच्या शिवारातील एका शेतात महिला मृतावस्थेत पडल्याची माहिती पिंपळनेर पोलिसांना मिळाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव सहारे हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. मृत महिलेची ओळख सुनंदा गोटू चौधरी (वय ४०, रा. वाकी, ता. साक्री) अशी पटली. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, शेतीच्या कारणावरून सुनंदा चौधरी यांचा पती गोटू गन्साराम चौधरी (वय ४६) याच्याशी वाद झाला होता. या वादातून गोटू चौधरी याने सुनंदा यांच्या डोक्यात आणि कपाळावर दगडाने मारहाण केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. घटनेनंतर पोलिसांनी संशयिताचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथक रवाना केले. गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने पोलिसांनी अवघ्या दोन तासांत गोटू चौधरी याचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने पत्नीच्या हत्येची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात भाग-५ गु.र.नं. १९०/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (बिएनएस) कलम १०३(१) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande