पीओकेतील बाग-हवेली येथील 4 जागांसाठी मतदान, अनेक केंद्रांवर शून्य मतदान
इस्लामाबाद , 11 ऑगस्ट (हिं.स.)।पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरमध्ये (पीओके) सोमवारी झालेल्या निवडणुकीदरम्यान विरोध आणि बहिष्काराचे चित्र स्पष्टपणे पाहायला मिळाले. बाग आणि हवेली जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांमध्ये कडेकोट सुरक्षा आणि देखरेखीखाली
पीओकेतील बाग-हवेली येथील चार जागांसाठी मतदान, अनेक केंद्रांवर शून्य मतदान


इस्लामाबाद , 11 ऑगस्ट (हिं.स.)।पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरमध्ये (पीओके) सोमवारी झालेल्या निवडणुकीदरम्यान विरोध आणि बहिष्काराचे चित्र स्पष्टपणे पाहायला मिळाले. बाग आणि हवेली जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांमध्ये कडेकोट सुरक्षा आणि देखरेखीखाली मतदान घेण्यात आले. मात्र, अनेक मतदान केंद्रांवर दिवसभर शुकशुकाट पाहायला मिळाला आणि एकही मत नोंदवले गेले नाही. काही व्हीव्हीआयपी मतदान केंद्रांवर मात्र नागरिकांनी मतदान केले.मतदानादरम्यान बूथ कॅप्चरिंगच्या आरोपावरून राजकीय कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. तसेच सरकारविरोधात निदर्शनेही करण्यात आली.

सोमवारी बाग आणि हवेली जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान झाले. यामध्ये हवेली जिल्ह्यातील बाग-४ मतदारसंघाचाही समावेश आहे. या मतदारसंघातून पीओकेचे विद्यमान पंतप्रधान फैसल मुमताज राठोड हे पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी)च्या उमेदवारीवर निवडणूक लढवत आहेत.सायंकाळी साडेपाच वाजता मतदान प्रक्रिया संपल्यानंतर सर्व मतदारसंघांमध्ये मतमोजणी सुरू करण्यात आली. याचदरम्यान बाग-२ विधानसभा मतदारसंघातील अनेक मतदान केंद्रांवर दिवसभर एकही मत पडले नसल्याचे समोर आले.

माध्यमांकडे बाग-२ मतदारसंघातील अनेक मतदान केंद्रांच्या निकालांची विशेष प्रत उपलब्ध आहे. त्यानुसार, मलोट परिसरातील बॉईज प्रायमरी स्कूलमध्ये असलेल्या मतदान केंद्र क्रमांक ११४ वर एकही मत पडले नाही. याचप्रमाणे गव्हर्नमेंट बॉईज हायस्कूल, बारा बाडी येथील मतदान केंद्रावरही मतदानाचा बहिष्कार करण्यात आला. बारा बाडी वेस्ट स्कूलमधील मतदान केंद्रावरही एकही मत नोंदवले गेले नाही.

मतदानाच्या बहिष्कारादरम्यान बूथ कॅप्चरिंगच्या आरोपावरून पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी)च्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचे वृत्त आहे.दरम्यान, बागमध्ये मतदान सुरू असताना काही नागरिक घराबाहेर पडले आणि त्यांनी पाकिस्तानी सरकारविरोधात निदर्शने केली. आंदोलकांनी मतदानाच्या बहिष्काराच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही केली.

पीओकेमधील चार विधानसभा मतदारसंघांमध्ये सुरू असलेल्या मतमोजणीदरम्यान बाग-१ मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला आहे. येथे अवामी दस्त-ओ-बाजू पक्षाचे साजिद इक्बाल यांनी पीओकेचे दोन वेळा पंतप्रधान राहिलेले आणि मुस्लिम कॉन्फरन्सचे प्रमुख सरदार अतीक खान यांचा पराभव केला.दरम्यान, बाग-४ मतदारसंघात विद्यमान पंतप्रधान फैसल मुमताज राठोड आघाडीवर आहेत. बाग-२ मतदारसंघात पीपीपीचे जिया उल कमर आघाडीवर असून, बाग-३ मतदारसंघात पीएमएल-एनचे सरदार मीर अकबर खान आघाडीवर आहेत.

पीओके मध्ये दोन टप्प्यांत झालेल्या निवडणुकीत पीएमएल-एनने आधीच बहुमताचा आकडा पार केला आहे. निवडणूक आयोगाकडून चारही मतदारसंघांचे अधिकृत आकडे मंगळवारी दुपारपर्यंत जाहीर होण्याची अपेक्षा आहे.आता उर्वरित सात विधानसभा मतदारसंघांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या भागांमध्ये सुरू असलेल्या विरोध आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात मतदान घेतले जाणार की पीओके मध्ये पीएमएल-एनचे सरकार स्थापन होऊन परिस्थिती सामान्य झाल्यानंतर या जागांवर निवडणूक होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande