डोनाल्ड ट्रम्प यांचा फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांना पाठिंबा
वॉशिंग्टन, 11 ऑगस्ट (हिं.स.)अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांना उघडपणे पाठिंबा दिला आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, जर फिफाने इन्फँटिनो यांना त्यांच्या अध्यक्षपदावरून हटवण्याचा विचार केला, तर ती एक ग
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फँटिनो


वॉशिंग्टन, 11 ऑगस्ट (हिं.स.)अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांना उघडपणे पाठिंबा दिला आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, जर फिफाने इन्फँटिनो यांना त्यांच्या अध्यक्षपदावरून हटवण्याचा विचार केला, तर ती एक गंभीर चूक ठरेल. २०२६ च्या फिफा विश्वचषकाच्या यशाचा दाखला देत त्यांनी म्हटले की, इन्फँटिनो यांच्या जाण्यानंतर फुटबॉल पुन्हा कधीही इतका यशस्वी किंवा फायदेशीर ठरणार नाही.

आपल्या 'ट्रुथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना ट्रम्प म्हणाले, जर फिफाने कोणत्याही कारणास्तव अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांना पदावरून दूर करण्याचा विचार केला, तर ती एक गंभीर चूक ठरेल. ते एक हुशार व्यक्ती आहेत आणि त्यांनी आतापर्यंतच्या सर्वात यशस्वी विश्वचषकाचे नेतृत्व केले आहे. जर ते गेले, तर तो पुन्हा कधीही इतका यशस्वी किंवा फायदेशीर ठरणार नाही.

खरं तर, फिफा अध्यक्ष इन्फँटिनो यांचे पद त्यांनी 'फिफा फॉरवर्ड एंटरप्राइज' योजनेची घोषणा केल्यापासून धोक्यात आले आहे. या योजनेत फिफा-संलग्न स्पर्धांमध्ये, विशेषतः फिफा विश्वचषकात, खाजगी क्षेत्राच्या सहभागासाठी आणि गुंतवणुकीसाठी मार्ग खुला करण्याचा प्रस्ताव होता. जगातील अनेक प्रमुख फुटबॉल संघटनांनी या प्रस्तावावर चिंता व्यक्त केली आहे. युएफा (UEFA), कॉनकाकॅफ (CONCACAF), इंग्लिश एफए (English FA) आणि आशियाई फुटबॉल महासंघ (AFC) यांसारख्या अनेक संघटनांनी याला विरोध केला. व्यापक विरोधानंतर, फिफाला ही योजना मागे घेण्यास भाग पडले.

इन्फँटिनो आणि फिफाचे महासचिव मॅटियास ग्राफस्ट्रॉम यांनी झालेल्या चुकांबद्दल माफी मागणारे एक निवेदन जारी केले. अशा चुका पुन्हा होणार नाहीत, असे आश्वासन दोघांनीही दिले. त्यांनी संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेऊन पुढील बैठकीत फिफा परिषदेसमोर आपले निष्कर्ष सादर करण्याचे आश्वासनही दिले. पण, या उपाययोजना करूनही, पुढील वर्षी मार्चमध्ये होणाऱ्या फिफा अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी इन्फँटिनो यांना आपले पद टिकवून ठेवणे आव्हानात्मक मानले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande