इराणवर माझा अजिबात विश्वास नाही- ट्रम्प
तेहरान, 12 ऑगस्ट (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ट्रम्प यांनी म्हटले की, त्यांचा इराणवर अजिबात विश्वास नाही. ते म्हणाले, “इराणवर विश्वास ठेवणारा मी शेवटचा व्यक्ती असेन. त्यांनी माझ्याशी सातत्या
इराणवर माझा अजिबात विश्वास नाही- ट्रम्प


तेहरान, 12 ऑगस्ट (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ट्रम्प यांनी म्हटले की, त्यांचा इराणवर अजिबात विश्वास नाही. ते म्हणाले, “इराणवर विश्वास ठेवणारा मी शेवटचा व्यक्ती असेन. त्यांनी माझ्याशी सातत्याने खोटे बोलले आहे.”

ट्रम्प यांनी दावा केला की, सध्या होर्मुझ सामुद्रधुनीवर अमेरिकेचे पूर्ण नियंत्रण आहे. ते म्हणाले, “त्यांचे (इराणचे) नियंत्रण नाही. आमचे पूर्ण नियंत्रण आहे. हा भाग आमच्या ताब्यात आहे.” ट्रम्प यांनी पुढे इशारा देताना म्हटले की, इराणने कोणत्याही वेळी काही करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला “उडवून दिले जाऊ शकते.” ते म्हणाले, “सध्या आम्ही अतिशय चांगल्या स्थितीत आहोत.”

दुसऱ्या एका वक्तव्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्या सुरक्षेबाबतही भाष्य केले. ते म्हणाले की, ते सीक्रेट सर्व्हिस आणि लष्कराच्या सूचनांचे पालन करतात. सुरक्षेसंदर्भातील निर्णय पूर्णपणे सीक्रेट सर्व्हिसवर अवलंबून असतो आणि सीक्रेट सर्व्हिस त्यांना जे करण्यास सांगते, तेच ते करतात, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

ट्रम्प यांनी सांगितले की, सीक्रेट सर्व्हिसने त्यांना वेगळ्या विमानाने आणि स्वतंत्र उड्डाणातून प्रवास करण्यास सांगितले होते. ते विमानही तितकेच सुरक्षित होते. मात्र, सीक्रेट सर्व्हिसला त्यांनी त्याच विमानातून प्रवास करावा असे वाटत होते, त्यामुळे त्यांनी त्यांच्या सूचनेनुसार निर्णय घेतला. ट्रम्प म्हणाले, “मी तेच करतो जे ते मला सांगतात.” पुढे ते म्हणाले की, “कदाचित तिथे काही धोका असावा.” ट्रम्प यांनी असेही सांगितले की, त्यांना सातत्याने अनेक धमक्या मिळत असतात.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande