सैनिकांच्या मानसिक तणावाच्या चर्चेदरम्यान अमेरिकेचा मोठा निर्णय; ‘ यूएसएस जॉर्ज वॉशिंग्टन’ मध्य पूर्वेकडे रवाना
वॉशिंग्टन, 14 ऑगस्ट (हिं.स.)।मध्य पूर्वेत इराणसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आपल्या ‘यूएसएस अब्राहम लिंकन’ या विमानवाहू युद्धनौकेच्या जागी ‘यूएसएस जॉर्ज वॉशिंग्टन’ ही विमानवाहू युद्धनौका तैनात करणार आहे. दरम्यान, 250 हून अधिक द
सैनिकांच्या मानसिक तणावाच्या चर्चेदरम्यान अमेरिकेचा मोठा निर्णय; ‘जॉर्ज वॉशिंग्टन’ मध्य पूर्वेकडे रवाना


वॉशिंग्टन, 14 ऑगस्ट (हिं.स.)।मध्य पूर्वेत इराणसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आपल्या ‘यूएसएस अब्राहम लिंकन’ या विमानवाहू युद्धनौकेच्या जागी ‘यूएसएस जॉर्ज वॉशिंग्टन’ ही विमानवाहू युद्धनौका तैनात करणार आहे.

दरम्यान, 250 हून अधिक दिवसांच्या असामान्यपणे दीर्घ तैनातीमुळे ‘यूएसएस अब्राहम लिंकन’वरील सैनिकांमध्ये गंभीर मानसिक तणाव निर्माण झाल्याच्या, आत्महत्येचे प्रयत्न झाल्याच्या तसेच मूलभूत सुविधांची अवस्था खालावल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. दूषित पाणी, अन्नाचा तुटवडा आणि खराब झालेली स्वच्छतागृहे यांसारख्या समस्यांमुळे सैनिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले जात आहे.

अमेरिकन नौदलाच्या निवेदनांनुसार आणि लष्करी हालचालींची माहिती असलेल्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ‘यूएसएस जॉर्ज वॉशिंग्टन’ हिंद महासागराच्या दिशेने रवाना झाली आहे. ही युद्धनौका अलीकडेच व्हिएतनाममधील दा नांग येथून रवाना झाली असून, त्यानंतर ती सिंगापूर आणि मलक्का सामुद्रधुनीमार्गे पुढे गेली आहे.

मात्र, अमेरिकन अधिकारी आणि नौदलाने या दाव्यांचे खंडन केले आहे. या फेरबदलाचा निर्णय ‘यूएसएस अब्राहम लिंकन’वरील परिस्थितीला थेट प्रतिसाद म्हणून नव्हे, तर पूर्वनियोजित तैनाती बदलाचा (रोटेशन) भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

वृत्तानुसार, ‘यूएसएस जॉर्ज वॉशिंग्टन’ ही विमानवाहू युद्धनौका ‘यूएसएस अब्राहम लिंकन’ची जागा घेणार आहे.

अमेरिकेने हा निर्णय अशा वेळी घेतला आहे, जेव्हा ‘यूएसएस अब्राहम लिंकन’वरील नौसैनिकांच्या कुटुंबीयांनी आणि काही खासदारांनी जहाजावरील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. 250 दिवसांहून अधिक काळ समुद्रात राहिल्यानंतर नौसैनिकांना गंभीर मानसिक तणाव आणि खालावत चाललेल्या जीवनमानाचा सामना करावा लागत असल्याचे काही अहवालांमध्ये म्हटले आहे. यामुळे काही नौसैनिकांनी आत्महत्येचे प्रयत्न केल्याचाही दावा करण्यात आला आहे.

‘यूएसएस अब्राहम लिंकन’वरील सुमारे 5,000 नौसैनिक आणि मरीन सैनिक 21 नोव्हेंबर रोजी सॅन डिएगो येथून रवाना झाले होते. सुरुवातीला त्यांची तैनाती प्रशांत महासागर क्षेत्रात करण्याचे नियोजन होते. मात्र, 28 फेब्रुवारी रोजी इराणसोबत अमेरिकेचे युद्ध सुरू झाल्यानंतर या युद्धनौकेला मध्य पूर्वेकडे वळवण्यात आले.

खासदारांच्या म्हणण्यानुसार, या विमानवाहू युद्धनौकेने 200 हून अधिक दिवस सलग कोणत्याही बंदरात थांबलेले नाही. त्यामुळे दीर्घकाळ सुरू असलेल्या लष्करी मोहिमा आणि तैनाती कायम ठेवण्याच्या नौदलाच्या क्षमतेची ही एक असामान्य परीक्षा ठरली आहे.

‘यूएसएस अब्राहम लिंकन’वरील मानसिक आरोग्याचे संकट वाढल्याच्या वृत्तांचे अमेरिकी नौदलाने खंडन केले आहे. नौदलाने म्हटले आहे की, जहाजावरील आत्महत्येचे विचार किंवा आत्महत्येच्या प्रयत्नांमध्ये कोणतीही वाढ नोंदवण्यात आलेली नाही. तसेच नौसैनिकांना वैद्यकीय सेवा, स्वच्छ पाणी आणि पौष्टिक अन्न उपलब्ध असल्याचेही नौदलाने स्पष्ट केले आहे.

अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनीही ‘यूएसएस अब्राहम लिंकन’वरील परिस्थिती खराब असल्याच्या वृत्तांना फेटाळून लावत, हे दावे पूर्णपणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.तथापि, नौदलाने हे मान्य केले आहे की युद्धामुळे मध्य पूर्वेतील पारंपरिक पुरवठा केंद्रांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे अन्न, स्वच्छता साहित्य आणि टपालाच्या पुरवठ्यात कमतरता तसेच विलंब झाला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande