बांग्लादेशचा ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का, डार्विन कसोटीत 9 विकेट्सने ऐतिहासिक विजय
डार्विन , 16 ऑगस्ट (हिं.स.) पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीवर पराभूत करून बांगलादेशने इतिहास रचला. डार्विन येथे खेळला गेलेला कसोटी सामना बांगलादेशने साडेतीन दिवसांत ९ गडी राखून जिंकला. ऑस्ट्रेलियातील बांगलादेशचा हा पहिला कसोटी विजय आहे
बांग्लादेशचा क्रिकेट संघ


डार्विन , 16 ऑगस्ट (हिं.स.) पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीवर पराभूत करून बांगलादेशने इतिहास रचला. डार्विन येथे खेळला गेलेला कसोटी सामना बांगलादेशने साडेतीन दिवसांत ९ गडी राखून जिंकला. ऑस्ट्रेलियातील बांगलादेशचा हा पहिला कसोटी विजय आहे. ऑस्ट्रेलियाने ५७ धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे बांगलादेशने एक गडी गमावून पूर्ण केले. हा बांगलादेशच्या इतिहासातील सर्वात मोठ्या विजयांपैकी एक आहे. या विजयामुळे बांगलादेशने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवसाच्या खेळाला १६१/४ या धावसंख्येने सुरुवात केली. कॅमेरॉन ग्रीनने ४३ धावांवरून आपला डाव पुढे नेत शतक झळकावले. ग्रीनच्या १०४ धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघ चौथ्या दिवशी आपल्या दुसऱ्या डावात २८४ धावांपर्यंत पोहोचू शकला. मात्र, पहिल्या डावात २२८ धावांनी पिछाडीवर असताना, यजमान ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात २८४ धावा करूनही पाहुण्या संघासमोर मोठे लक्ष्य ठेवू शकले नाही आणि केवळ ५७ धावांचे लक्ष्य ठेवले, जे बांगलादेशने सहज गाठले.

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात १९८ धावांवर सर्वबाद झाला, ज्याच्या प्रत्युत्तरात बांगलादेशने ४२६ धावा करून पाहुण्या संघावर दबाव आणला. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात, ग्रीन वगळता इतर कोणत्याही फलंदाजाने चांगली कामगिरी केली नाही. स्टीव्ह स्मिथने ४४ आणि ॲलेक्स कॅरीने ३० धावा केल्या. मार्नस लॅबुशेनने ३१ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव संपुष्टात आल्यानंतर, बांगलादेश लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला, पण त्यांची सुरुवात खराब झाली. सलामीवीर तन्झिद हसन शून्यावर असताना जोश हेझलवूडच्या गोलंदाजीवर बाद झाला. शादमन इस्लामने मोमिनुल हकसोबत मिळून बांगलादेशच्या ऐतिहासिक विजयाची नोंद केली. या दोघांनी ७५ चेंडूंमध्ये ५३ धावांची भागिदारी करत आपल्या संघाला ऐतिहासिक विजयाला गवसणी घालून दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande