बांग्लादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी वेदरॉल्डला ऑस्ट्रेलियन संघातून वगळले तर रेनशॉला संधी
मेलबर्न, १८ ऑगस्ट (हिं.स.) बांगलादेशविरुद्ध डार्विन कसोटीत झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर, ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या आणि अंतिम कसोटीसाठी आपल्या संघात एक बदल केला आहे. सलामीवीर जेक वेदरॉल्डला संघातून वगळण्यात आले असून, त्याच्या जागी डावखुरा फलंदाज मॅथ्
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ


मेलबर्न, १८ ऑगस्ट (हिं.स.) बांगलादेशविरुद्ध डार्विन कसोटीत झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर, ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या आणि अंतिम कसोटीसाठी आपल्या संघात एक बदल केला आहे. सलामीवीर जेक वेदरॉल्डला संघातून वगळण्यात आले असून, त्याच्या जागी डावखुरा फलंदाज मॅथ्यू रेनशॉचा समावेश करण्यात आला आहे.

डार्विनमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीत बांगलादेशकडून ऑस्ट्रेलियाला नऊ गडी राखून दारुण पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे संघाच्या फलंदाजीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पहिल्या कसोटीत वेदरॉल्डला केवळ २३ धावा आणि शून्य धावा करता आल्या.

वेदरॉल्डने गेल्या वर्षी मायदेशात झालेल्या ॲशेस मालिकेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. सहा कसोटी सामन्यांमध्ये त्याने २०.३६ च्या सरासरीने २२४ धावा केल्या असून, त्यात केवळ एका अर्धशतकाचा समावेश आहे.

मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी वेदरॉल्डच्या तंत्रात केलेल्या बदलांविषयी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, फलंदाजाने आपल्या फलंदाजीच्या पवित्र्यात आणि हालचालींमध्ये काही बदल केले आहेत. पण, त्यांनी हे मान्य केले की, इतक्या कमी धावांच्या आधारावर, आंतरराष्ट्रीय दबावाखाली हे बदल किती प्रभावी ठरतील याचा अंदाज लावणे कठीण आहे.

ऑस्ट्रेलिया एक सुरक्षित पर्याय म्हणून रेन्शॉचा संघात समावेश करण्याचा विचार करत आहे. मॅके येथे कसोटी पदार्पण करणाऱ्या रेन्शॉने याच मैदानावर यापूर्वीच दोन प्रथम-श्रेणी शतके झळकावली आहेत. ३० वर्षीय रेन्शॉने आपला शेवटचा कसोटी सामना जवळपास तीन वर्षांपूर्वी भारताविरुद्ध खेळला होता. त्याने १४ कसोटी सामन्यांतील २४ डावांमध्ये ६४५ धावा केल्या असून, त्यात एका शतकाचा आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची फलंदाजीची सरासरी २९.३१ आहे. पण रेन्शॉने देशांतर्गत शेफिल्ड शील्डमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. त्याने क्वीन्सलँडसाठी १० डावांमध्ये जवळपास ५० च्या सरासरीने ४९९ धावा केल्या असून, त्यात तीन शतके आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande