गॉल कसोटीचा दुसरा दिवसही भारताचाच; पडिक्कलची 167 धावांची खेळी
गॉल(श्रीलंका), 16 ऑगस्ट (हिं.स.)देवदत्त पडिक्कलच्या १६७ धावा आणि ध्रुव जुरेलच्या अर्धशतकामुळे भारतीय संघाने पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी आपले वर्चस्व कायम ठेवले. पडिक्कलच्या शतकाच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या दिवशी २८८ धावा करून वर्चस्व गाजवल
देवदत्त पडिक्कल


गॉल(श्रीलंका), 16 ऑगस्ट (हिं.स.)देवदत्त पडिक्कलच्या १६७ धावा आणि ध्रुव जुरेलच्या अर्धशतकामुळे भारतीय संघाने पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी आपले वर्चस्व कायम ठेवले. पडिक्कलच्या शतकाच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या दिवशी २८८ धावा करून वर्चस्व गाजवले होते. पडिक्कल दुसऱ्या दिवशीही शानदार फलंदाजी केली, पण त्याचे द्विशतक पूर्ण होऊ शकले नाही.

गॉलची खेळपट्टी फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल होती, पण भारतीय फलंदाज संयमाने खेळले. पहिल्या दिवशी दुखापतीमुळे मैदान सोडलेला केएल राहुल फलंदाजीसाठी परतला, पण त्याला आपले शतक पूर्ण करता आले नाही. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी दुसऱ्या दिवशी पुनरागमन करत बळी घेतले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपता संपता भारतीय संघाने ९ गडी गमावून ४६० धावा केल्या होत्या.

कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी शतक झळकावलेल्या पडिक्कलने दुसऱ्या दिवशीही शानदार फलंदाजी करत भारताच्या ४६० धावांच्या भागीदारीत महत्त्वाची भूमिका बजावली. पडिक्कलने सामन्यात २३० चेंडूंचा सामना करत १५ चौकार आणि एका षटकारासह १६७ धावा केल्या. श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन १५० पेक्षा जास्त धावा करणारा तो केवळ तिसरा भारतीय फलंदाज ठरला. पडिक्कलच्या आधी राहुल द्रविड आणि चेतेश्वर पुजारा यांनी ही कामगिरी केली होती. पहिल्याच दिवशी शतक झळकावणाऱ्या विराट कोहलीच्या पंक्तीत तो सामील झाला.

पडिक्कल बाद झाल्यानंतर जुरेलने सूत्रे हाती घेतली. त्याने अर्धशतक झळकावले. जुरेलने ६८ चेंडूंमध्ये ५१ धावांची खेळी केली. त्याच्या खेळीमुळे भारताला ४०० धावांचा टप्पा ओलांडून ४५० धावांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. जुरेलसोबतच ऋषभ पंतनेही ३९ धावा केल्या. रवींद्र जडेजा आणि मानव सुतार चांगली कामगिरी करू शकले नाहीत. जडेजाने १३, तर सुथारने २४ धावा केल्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाने ९ गडी गमावून ४६० धावा केल्या होत्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande