गॉल कसोटीवर टीम इंडियाची मजबूत पकड, मानव सुथारच्या फिरकीची कमाल
गॉल(श्रीलंका), 17 ऑगस्ट (हिं.स.) गॉल कसोटीच्या तिसऱ्या दिवशी सोनल दिनुशा आणि निरोशन डिकवेला यांनी श्रीलंकेला फॉलो-ऑनपासून वाचवले, पण भारतीय संघाने भक्कम आघाडी घेतली. भारताने पहिल्या डावात ४६२ धावा केल्या आणि दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी श्रीलंकेला २८४
भारतीय क्रिकेट संघ


गॉल(श्रीलंका), 17 ऑगस्ट (हिं.स.) गॉल कसोटीच्या तिसऱ्या दिवशी सोनल दिनुशा आणि निरोशन डिकवेला यांनी श्रीलंकेला फॉलो-ऑनपासून वाचवले, पण भारतीय संघाने भक्कम आघाडी घेतली. भारताने पहिल्या डावात ४६२ धावा केल्या आणि दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी श्रीलंकेला २८४ धावांवर सर्वबाद करून १७८ धावांची आघाडी घेतली. श्रीलंकेचा संघ सर्वबाद झाल्यानंतर पावसामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ लवकर थांबवण्यात आला. आता भारत आपली आघाडी आणखी मजबूत करण्याच्या उद्देशाने चौथ्या दिवशी दुसऱ्या डावासाठी मैदानात उतरेल.

श्रीलंकेच्या क्रिकेटपटूं सुरुवातीलाच झटपट विकेट गमावल्या आणि त्यांच्या अर्ध्या संघाला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. त्यानंतर सोनल दिनुशा आणि निरोशन डिकवेला यांनी सूत्रे हाती घेतली आणि श्रीलंकेला संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण, असे असूनही, श्रीलंकेचा संघ २८४ धावांवर सर्वबाद झाला. भारताने पहिल्या डावातच १७८ धावांची आघाडी घेतली आहे.

एका क्षणी श्रीलंकेचा संघ अडचणीत सापडल्यासारखा दिसत होता. तेव्हा, सोनल दिनुशाने डिकवेलासोबत मिळून संघाची सूत्रे हाती घेतली. त्या दोघांनी शतकी भागीदारी करून संघाला २०० धावांच्या पुढे नेले. दिनुशाने शतक झळकावले, तर डिकवेला ८० धावांवर बाद झाला. प्रसिद्ध कृष्णाने डिकवेलाला बाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली आणि त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. मानव सुथार आणि रवींद्र जडेजा यांनी भारतासाठी उत्कृष्ट कामगिरी केली.

अफगाणिस्तानविरुद्ध पदार्पण करणाऱ्या मानव सुथारने श्रीलंकेच्या भूमीवर आपल्या फिरकी गोलंदाजीने कमाल केली. सुथारने २१.४ षटकांत ७६ धावा देऊन चार बळी घेतले. दुसरीकडे, जडेजाही मागे नव्हता. त्याने आपला अनुभव दाखवत विरोधी संघाच्या तीन फलंदाजांना बाद केले. त्यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे श्रीलंकन संघ २८४ धावांवर सर्वबाद झाला, ज्यामुळे भारताला १७८ धावांची आघाडी मिळाली. मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande