वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्सच्या तिसऱ्या हंगामात डेव्हिड वॉर्नरची एन्ट्री
नवी दिल्ली, 17 ऑगस्ट (हिं.स.)क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. चाहत्यांना पुन्हा एकदा अनेक दिग्गजांना एकत्र मैदानावर पाहण्याची संधी मिळणार आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्सच्या (डब्ल्यूसीएल) तिस
डेव्हिड वॉर्नर


नवी दिल्ली, 17 ऑगस्ट (हिं.स.)क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. चाहत्यांना पुन्हा एकदा अनेक दिग्गजांना एकत्र मैदानावर पाहण्याची संधी मिळणार आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्सच्या (डब्ल्यूसीएल) तिसऱ्या हंगामात खेळताना दिसणार आहे. आयोजकांनी ही घोषणा केली. डब्ल्यूसीएलचा तिसरा हंगाम ३ ते १८ ऑक्टोबर दरम्यान खेळवला जाईल. मात्र, स्पर्धेचे ठिकाण अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. वॉर्नर व्यतिरिक्त, युवराज सिंग, एबी डिव्हिलियर्स, ड्वेन ब्राव्हो, शाहिद आफ्रिदी आणि मोईन अली यांसारखे माजी महान क्रिकेटपटूही या हंगामात उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

पूर्वीचे अनेक स्टार क्रिकेटपटू तिसऱ्या हंगामातही त्यांच्या संघांचा भाग राहतील. यामध्ये युवराज सिंग, एबी डिव्हिलियर्स, डीजे ब्राव्हो, शाहिद आफ्रिदी आणि मोईन अली यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, डेव्हिड वॉर्नर आणि बांगलादेशचा माजी अष्टपैलू खेळाडू महमुदुल्ला रियाद यांसारखी मोठी नावे देखील या स्पर्धेत सामील होणार आहेत, ज्यामुळे तिसऱ्या हंगामाची उत्सुकता आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. आयोजकांनी सांगितले, सलग दोन विक्रमी हंगामांनंतर, डब्ल्यूसीएल 2026 मध्ये आणखी मोठे स्टार क्रिकेटपटू, अधिक उत्साह, अधिक राष्ट्रीय अभिमान आणि क्रिकेटचे अनेक अविस्मरणीय क्षण पाहायला मिळतील. तिसऱ्या हंगामासाठी बांगलादेश चॅम्पियन्सचाही स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे.

डब्ल्यूसीएलचा पहिला हंगाम इंडियन चॅम्पियन्सने जिंकला होता. त्यांनी अंतिम सामन्यात पाकिस्तान चॅम्पियन्सवर मात करत ट्रॉफी जिंकली होती. दुसऱ्या हंगामात, साऊथ आफ्रिका चॅम्पियन्सने पाकिस्तान चॅम्पियन्सवर मात करत विजेतेपद पटकावले. पाकिस्तान सलग दोनदा अंतिम फेरीत पोहोचला, पण दोन्ही वेळा त्यांचा पराभव झाला. तिसऱ्या हंगामात बांगलादेश चॅम्पियन्सच्या समावेशामुळे संघांची संख्या आणि सामन्यांची उत्सुकता वाढण्याची अपेक्षा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande