
अकोला, 18 ऑगस्ट (हिं.स.)। 18 जून रोजी तयार झालेला रस्ता 18 ऑगस्टपर्यंत खड्डेमय झाला असून या खड्डेमय रस्त्यामुळे दिंडी मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. शेगाव ते पंढरपूर हा वारी मार्ग गेल्या आठ ते दहा वर्षापासून अजूनही अपूर्ण अवस्थेत आहे. अकोला वरून शेगाव येथे जाण्यासाठी कमी अंतराचा मार्ग म्हणून या मार्गावरून भक्तांची खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. शनिवारी रात्री तर या मार्गावरून हजारो भावीक भक्त पैदल यात्रा करतात. निमकरदा गावाच्या बाहेर अर्धा किलोमीटर रस्ता तयार करण्यात आला. या अर्ध्या किलोमीटरच्या अंतरात तीस ते चाळीस गड्डे पडले असून वाहनधारकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागते. त्याचप्रमाणे सध्या स्थितीत हा मार्ग एकेरीस बनवण्यात आल्यामुळे वाहतुकीची कोंडी सुद्धा मोठ्या प्रमाणात होते. या मार्गावरील हे खड्डे ताबडतोब भूजविण्यात यावे यासाठी संबंधित विभागास निवेदन देण्यात आले होते. परंतु अल्टिमेट देऊन सुद्धा या मार्गाची दुरुस्ती न झाल्यामुळे संभाजी ब्रिगेड च्या वतीने बस स्टॅन्ड चौक निमकरदा येथे प्रतिकात्मक श्रद्धांजली आंदोलन करण्यात आले.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष देवानंद साबळे युवक आघाडी जिल्हाध्यक्ष रवी गावंडे आझाद फाउंडेशनचे गोपाल पोहरे महानगराध्यक्ष योगेश ढोरे देवा गावंडे पंकज बाजोड तालुका अध्यक्ष विष्णू अरबट राम निंबेकर हर्षल धांडे पियुष पवार अभिषेक साबळे ऋषिकेश साबळे अंकित देवरे संजय मगर वसंत कोकाटे गणेश साबळे धम्मदी वानखडे सतीश लळे गजानन खेडकर तोताराम आप्पा उकर्डे अतुल ताले अनंत वाटूरकर चेतन माहोरे योगेश ठाकरे ओम उकर्डे व निमकरदा गावातील बहुसंख्य ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. उरल पोलीस स्टेशनच्या वतीने यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
56% कमिशन खाणारे लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी असताना हा मार्ग सुद्धा 56 दिवसातच पूर्णपणे उघडला गेला. संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जाणा-या भक्तांचे बळी गेल्याशिवाय प्रशासनाला जाग येणार नाही असेच दिसते - देवानंद साबळे, जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड, अकोला
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे