अकोला आता होणार 'स्वच्छ आणि सुंदर शहर'; घरोघरी जाऊन कचरा उचलण्यासाठी महापालिकेकडून कंत्राट जाहीर
अकोला, 19 ऑगस्ट (हिं.स.)। अकोला शहराला कचरामुक्त करण्यासाठी आणि स्वच्छतेचा दर्जा सुधारण्यासाठी अकोला महानगरपालिकेने एक मोठे आणि महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. अकोला शहर आता ''स्वच्छ शहर, सुंदर शहर'' बनवण्याच्या उद्देशाने महापालिकेने शहरातील कचरा उ
अकोला आता होणार 'स्वच्छ आणि सुंदर शहर'; घरोघरी जाऊन कचरा उचलण्यासाठी महापालिकेकडून कंत्राट जाहीर


अकोला, 19 ऑगस्ट (हिं.स.)।

अकोला शहराला कचरामुक्त करण्यासाठी आणि स्वच्छतेचा दर्जा सुधारण्यासाठी अकोला महानगरपालिकेने एक मोठे आणि महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. अकोला शहर आता 'स्वच्छ शहर, सुंदर शहर' बनवण्याच्या उद्देशाने महापालिकेने शहरातील कचरा उचलण्याचे काम एका खाजगी कंत्राटदाराला दिले आहे. या नव्या कंत्राटामुळे शहरातील कचरा व्यवस्थापनाला मोठी गती मिळणार आहे. या नवीन उपक्रमांतर्गत, कंत्राटदाराच्या माध्यमातून आता अकोला शहरातील प्रत्येक नागरिकाच्या दारापर्यंत जाऊन (डोअर-टू-डोअर) कचरा गोळा केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना घरातला कचरा टाकण्यासाठी बाहेर जाण्याची गरज पडणार नाही.

घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्यासोबतच, शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांच्या कडेला किंवा रिकाम्या भूखंडांवर साचलेला कचरा साफ करण्याची जबाबदारीही या कंत्राटदारावर सोपवण्यात आली आहे. अनेकदा मुख्य रस्त्यांवर किंवा चौकांमध्ये कचरा साचून राहिल्याने शहराचे सौंदर्य बिघडत होते, मात्र आता हा कचराही नियमितपणे उचलला जाणार आहे.

महापालिकेच्या या कडक आणि सुनियोजित निर्णयामुळे अकोला शहर संपूर्णपणे कचरामुक्त होण्यास मदत होणार आहे. या मोहिमेमुळे शहराचा चेहरामोहरा बदलणार असून, अकोल्याला एक स्वच्छ, आरोग्यदायी आणि सुंदर शहर बनवण्यासाठी महापालिकेने नागरिकांनाही कचरा न पसरवता या मोहिमेत सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande