
बीड, 18 ऑगस्ट (हिं.स.)। पवित्र श्रावण महिन्याचे औचित्य साधून 'द आर्ट ऑफ लिविंग' परिवारातर्फे परळी वैजनाथ येथे भव्य 'श्रावण मास रुद्र पूजा' सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा विशेष धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रम गुरुवार, दिनांक २० ऑगस्ट २०२६ रोजी संध्याकाळी ६:०० वाजता संपन्न होणार आहे.
श्री श्री ज्ञान क्षेत्र (श्री श्री ज्ञान मंदिर, अय्यप्पा मंदिरच्या बाजूला, वैद्यनाथ मंदिर पार्किंगच्या पाठीमागे, परळी-वैजनाथ) येथे होणारा हा सोहळा परम पूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकर जी यांच्या प्रेरणेने आयोजित करण्यात आला आहे. श्रावण महिन्यात शिव उपासना केल्याने मनात शांती निर्माण होते, नकारात्मकता दूर होते, तसेच आरोग्य, समृद्धी आणि आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग प्रशस्त होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
या पवित्र रुद्र पूजेमध्ये सहभागी होण्यासाठी भाविकांना संकल्प नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहिती आणि संपर्कासाठी पुढील क्रमांकांवर संपर्क साधता येईल: 9860474821, 9850258565, 9373871876. आयोजकां तर्फे सर्व शिवभक्तांना या सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis