हॉकी विश्वचषक २०२६: इंग्लंडचा भारतावर ४-२ ने विजय, भारतीय संघाचा उपांत्य फेरीचा मार्ग खडतर
ॲमस्टेलवीन (नेदरलँड्स), 18 ऑगस्ट (हिं.स.)एफआयएच विश्वचषकाच्या ''पूल डी'' मधील सर्वात कठीण सामन्यात, जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या संघाविरुद्ध बचावातील एका चुकीमुळे भारताला इंग्लंडकडून ४-२ ने पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे भारताचा उपांत्य फेरीच
भारतीय हॉकी संघ


ॲमस्टेलवीन (नेदरलँड्स), 18 ऑगस्ट (हिं.स.)एफआयएच विश्वचषकाच्या 'पूल डी' मधील सर्वात कठीण सामन्यात, जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या संघाविरुद्ध बचावातील एका चुकीमुळे भारताला इंग्लंडकडून ४-२ ने पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे भारताचा उपांत्य फेरीचा मार्ग तर कठीण झालाच आहे, पण १९ ऑगस्ट रोजी पाकिस्तानविरुद्धचा सामना भारताला जिंकावाच लागणार आहे. पुढील फेरीत पोहोचण्यासाठी भारताला पाकिस्तानला कोणत्याही परिस्थितीत हरवावेच लागेल. जर हे शक्य झाले नाही, तर भारतीय संघाला वेल्स आणि इंग्लंड यांच्यातील सामन्याच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल.

दुसऱ्या क्वार्टरमध्ये दोन गोल करणाऱ्या भारतीय संघाने इंग्लंडला शेवटच्या ३० मिनिटांत आपला बचाव भेदण्याची संधी दिली. निकोलस बेंदारुकने इंग्लंडसाठी दोन गोल केले (१४ व्या आणि ५५ व्या मिनिटाला), तर स्टुअर्ट रसमेयर (३९ व्या मिनिटाला) आणि हेन्री क्रॉफ्ट (४३ व्या मिनिटाला) यांनी प्रत्येकी एक गोल केला. कर्णधार हरमनप्रीत सिंग (१७ व्या मिनिटाला) आणि दिलप्रीत सिंग (२५ व्या मिनिटाला) यांनी भारतासाठी गोल केले. या महत्त्वपूर्ण सामन्यात भारतीय संघ चार पेनल्टी कॉर्नरपैकी केवळ एकाचेच गोलमध्ये रूपांतर करू शकला.

दोन्ही सामने जिंकल्यानंतर इंग्लंड 'पूल डी' मध्ये आघाडीवर आहे, तर एक विजय आणि एक पराभवानंतर भारत दुसऱ्या स्थानावर आहे. वेल्ससोबत सामना बरोबरीत सुटल्यानंतर, एक पराभव आणि एक बरोबरीसह पाकिस्तान तिसऱ्या स्थानावर आहे, आणि गोल सरासरीच्या आधारावर वेल्स शेवटच्या स्थानावर आहे. पूलमधील अव्वल दोन संघ दुसऱ्या फेरीत प्रवेश करतील. भारताने यापूर्वी वेल्सला ३-१ ने पराभूत केले होते. पुढील फेरीत प्रवेश करण्यासाठी, भारताला आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभूत करावे लागेल किंवा त्याच्यासोबत सामना बरोबरीत सोडवावा लागेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande