छ. संभाजीनगर - ९० वर्षीय स्वातंत्र्यसैनिक आजींवर शेतरस्त्यासाठी उपोषणाची वेळ
छत्रपती संभाजीनगर, 19 ऑगस्ट (हिं.स.)। स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणाऱ्या ९० वर्षीय स्वातंत्र्यसैनिक मुक्ताबाई आप्पासाहेब निवारे यांच्यावर हक्काच्या शेतजमिनीसाठी उपोषण करण्याची वेळ आली. आनंदपूर शिवारातील गट क्र. ११८ मधून रहदारीसाठी देण्यात आलेला रस्त
छ. संभाजीनगर - ९० वर्षीय स्वातंत्र्यसैनिक आजींवर शेतरस्त्यासाठी उपोषणाची वेळ


छत्रपती संभाजीनगर, 19 ऑगस्ट (हिं.स.)। स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणाऱ्या ९० वर्षीय स्वातंत्र्यसैनिक मुक्ताबाई आप्पासाहेब निवारे यांच्यावर हक्काच्या शेतजमिनीसाठी उपोषण करण्याची वेळ आली. आनंदपूर शिवारातील गट क्र. ११८ मधून रहदारीसाठी देण्यात आलेला रस्ता रद्द करावा, या मागणीसाठी त्यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले.

प्रशासनाने पूर्वसूचना न देता शेतातून रस्ता दिल्याचा आरोप त्यांनी केला. नकाशाप्रमाणे किंवा सामाईक बांधावरून पर्यायी रस्ता द्यावा, अशी त्यांची मागणी आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अपील करूनही दखल न घेतल्याने त्यांनी उपोषणाचे पाऊल उचलले. प्रशासनाकडून पत्र मिळाल्यानंतर सायंकाळी उपोषणाची सांगता झाली. “पूर्वी स्वातंत्र्यासाठी लढलो, आता न्यायासाठी उपोषण करावे लागत आहे,” अशी खंत मुक्ताबाई यांनी व्यक्त केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande