‘सप्तरंग राष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सव २०२६’मध्ये कला-संस्कृतीचे दर्शन
नांदेड, १९ ऑगस्ट (हिं.स.)। सप्तरंग सेवाभावी संस्था आणि नांदेड जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘सप्तरंग राष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सव २०२६’ला शिवसेना आमदार आनंद बोंढारकर यांनी उपस्थिती लावली. या महोत्सवात शास्त्रीय व
अ


नांदेड, १९ ऑगस्ट (हिं.स.)। सप्तरंग सेवाभावी संस्था आणि नांदेड जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘सप्तरंग राष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सव २०२६’ला शिवसेना आमदार आनंद बोंढारकर यांनी उपस्थिती लावली.

या महोत्सवात शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीत, गायन, वादन, लोकनृत्य तसेच लावणी अशा विविध कलाप्रकारांचे अप्रतिम सादरीकरण करण्यात आले. देशभरातून सहभागी झालेल्या कलाकारांनी आपल्या अद्वितीय प्रतिभेचे दर्शन घडवत महोत्सवाची रंगत वाढवली. विविध कला प्रकारांच्या सादरीकरणातून भारतीय कला-संस्कृतीचे समृद्ध आणि वैविध्यपूर्ण दर्शन उपस्थितांना घडले.

यावेळी बोलताना आमदार आनंद बोंढारकर यांनी कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देतानाच भारतीय सांस्कृतिक परंपरांचे जतन व संवर्धन करणारा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले. या सुंदर आयोजनासाठी डॉ. सान्वी जेठवानी आणि त्यांच्या संपूर्ण टीमसह नांदेड जिल्हा प्रशासनाचे त्यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.

महोत्सवाला आमदार बालाजीराव कल्याणकर, भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रणिताताई देवरे चिखलीकर, शिवालय उद्योग समूहाच्या अध्यक्षा सौ. संध्याताई कल्याणकर, शिवसेना जिल्हाप्रमुख गंगाधर बडुरे, फरिदा बकस, अर्चना बकस, ऋषी पालजी, हर्षद शहा, बालाजी पेनुरकर आणि ओमप्रकाश दरक यांची उपस्थिती होती.

-------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande