अंबाजोगाई न. प. प्रशासनाच्या विरोधात बसलेले अभिजित लोमटे यांचे सहाव्या दिवशीही उपोषण सुरूच
बीड, 19 ऑगस्ट (हिं.स.)। अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष तथा पत्रकार अभिजित लोमटे हे मागील सहा दिवसापासून अंबाजोगाई नगर परिषद प्रशासनाच्या कारभाराच्या विरोधात आमरण उपोषण करत आहेत. या उपोषणाची दखल माजी केंद्रीय मंत्री तथा पर्
उपोषण


बीड, 19 ऑगस्ट (हिं.स.)। अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष तथा पत्रकार अभिजित लोमटे हे मागील सहा दिवसापासून अंबाजोगाई नगर परिषद प्रशासनाच्या कारभाराच्या विरोधात आमरण उपोषण करत आहेत. या उपोषणाची दखल माजी केंद्रीय मंत्री तथा पर्यावरण प्रेमी मेनका गांधी घेतली असून शहरातील अनेक सामाजिक संघटना यांच्या कडून जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यात आला आहे.

अंबाजोगाई शहरातील जयवंती नदीपात्रात बेकायदेशीर रित्या करण्यात आलेले बांधकाम तथा अतिक्रमण, महाराष्ट्र बँकेच्या समोर असलेली पुरातन विहीर बुजवून तिथे गाळे काढण्यात आल्याने, त्याचबरोबर सर्व्ह न १७ येथील डम्पिंग ग्राउंडवर अनेक श्वानांचे संशयास्पद मृत्यू, मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह तथा मराठा भवन उभारणी, तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे सुशोभीकरण करणे अशा विषयांवर अंबाजोगाई नगर परिषद प्रशासन डोळेझाक करत असल्याबद्दल काँग्रेसचे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष तथा संग्राम महाराष्ट्राचा न्यूजचे संपादक अभिजीत लोमटे हे आमरण उपोषण करत आहेत.

अभिजित लोमटे यांच्या आमरण उपोषणास अंबाजोगाई शहरातील विविध सामाजिक तथा राजकीय संघटनानी जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे. यामध्ये प्रामुख्याने शिवसेनेचे मदनलाल परदेशी, लोकजनशक्ती पार्टीचे तेजस व्हावळे ,आर पी आयचे महेंद्र निकाळजे, अमर देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारचे राजेसाहेब देशमुख, शेतकरी संघटनेचे कालिदास आपेट , धीमंत राष्ट्रपाल यांच्यासह अनेक नेत्यांनी अभिजित लोमटे यांच्या उपोषणास प्रत्यक्ष भेट देऊन पाठिंबा जाहीर केला आहे. लोमटे यांच्या आमरण उपोषणा बाबत नगर परिषद प्रशासन काय कार्यवाही करते याकडे संपूर्ण अंबाजोगाई करांचे लक्ष लागून राहिले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande