भाजप संघटन बळकटीकडे निर्णायक वाटचाल!
छत्रपती संभाजीनगर, 19 ऑगस्ट (हिं.स.)। नाशिक येथे स्वामीनारायण बँक्वेट हॉलमध्ये आज भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रच्या वतीने आयोजित उत्तर महाराष्ट्र व मराठवाडा विभागीय संघटनात्मक बैठकीस महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची प्रामुख्याने उपस्
अ


छत्रपती संभाजीनगर, 19 ऑगस्ट (हिं.स.)।

नाशिक येथे स्वामीनारायण बँक्वेट हॉलमध्ये आज भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रच्या वतीने आयोजित उत्तर महाराष्ट्र व मराठवाडा विभागीय संघटनात्मक बैठकीस महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस भाजपा केंद्रीय महामंत्री तरुण चुग, SIR महाराष्ट्र प्रभारी भगवानदास सबनानी, SIR प्रदेश संयोजक डॉ. किरीट सोमय्या तसेच सुनील राणे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

यावेळी संघटन विस्तार, बूथ सक्षमीकरण, SIR अभियान आणि आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने पक्षसंघटना अधिक सक्षम करण्याबाबत सविस्तर चर्चा व मार्गदर्शन झाले.

भाजपाचे विचार, कार्य आणि संघटन तळागाळापर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचवत भक्कम, सक्षम आणि विजयश्रीकडे वाटचाल करणारे संघटन उभारण्याचा संकल्प या बैठकीत अधिक दृढ झाला.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande