जालना जिल्हा परिषद उपकर योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
जालना, 19 ऑगस्ट, (हिं.स.)। कृषी विभाग जिल्हा परिषद मार्फत जिल्हा परिषद उपकर योजना सन 2026-27 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदान तत्त्वावर पुरविण्यासाठी महत्तम अनुदान मर्यादेच्या अधिन राहून खालीलप्रमाणे कृषी औजरासाठी तालुकास्तरावर प्राप्त होणाऱ
जालना जिल्हा परिषद उपकर योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन


जालना, 19 ऑगस्ट, (हिं.स.)। कृषी विभाग जिल्हा परिषद मार्फत जिल्हा परिषद उपकर योजना सन 2026-27 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदान तत्त्वावर पुरविण्यासाठी महत्तम अनुदान मर्यादेच्या अधिन राहून खालीलप्रमाणे कृषी औजरासाठी तालुकास्तरावर प्राप्त होणाऱ्या अर्जातील शेतकऱ्यांची जिल्हास्तरावर संगणकीय लॉटरी पध्दतीने निवड करण्यात येणार आहे. जिल्हा परीषद उपकर योजना सन 2026-27 मधील औजरांवर खालीलप्रमाणे अनुदान देय आहे.

ट्रॅक्टर (20 P.T.O.H.P व त्यापुढील)- किंमतीच्या 40 टक्के जास्तीत जास्त रु.1 लाख 25 हजार च्या मर्यादेत (यापैकी जी कमी असेल ती), ट्रॅक्टरचलीत रोटाव्हेटर किंमतीच्या 40 टक्के जास्तीत जास्त रु. 36 हजार 800 च्या मर्यादेत (यापैकी जी कमी असेल ती), मानवचलीत टोकन यंत्र किंमतीच्या 50 टक्के जास्तीत जास्त रु. 8 हजार च्या मर्यादेत स्ट्रॉ चॉपर/श्रेडर/मल्चर माऊंटेड किंमतीच्या 40 टक्के जास्तीत जास्त रु. 58 हजार च्या मर्यादेत (यापैकी जी कमी असेल ती).

योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे : लाभार्थीजवळ स्वतःच्या नावे जमिनीचा 7/12, 8 अ उतारा,आधार कार्ड, बँक पासबुक तसेच ट्रॅक्टरचलीत औजारांसाठी अर्जदाराचे स्वतःच्या नावे असलेले ट्रॅक्टर आरसी बुक आवश्यक आहे. तरी जिल्ह्यातील शेतक-यांनी योजनेचा लाभ घेणे करीता संबंधीत पंचायत समिती स्तरावर दि. 19 ऑगस्ट 2026 ते दि. 11 नोव्हेंबर 2026 पर्यंत कार्यालयीन वेळेत ऑफलाईन पध्दतीने अर्ज करावेत. या योजनेसाठी जास्तीत जास्त शेतक-यांनी अर्ज करून सहभाग नोंदवावा असे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कृष्णकांत कनवारिया, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी शिरिष बनसोडे, आणि कृषी विकास अधिकारी पी. बी. बनसावडे यांनी आवाहन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande