नांदेड जिल्ह्यातील आ. अमर राजूरकर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट
नांदेड, 19 ऑगस्ट (हिं.स.)। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नांदेड जिल्ह्यातील आमदार अमर राजूरकर यांनी सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नांदेड जिल्ह्यातील विविध विकास कामांबाबत त्यांना सविस्तर निवेदन देऊन चर्
अ


नांदेड, 19 ऑगस्ट (हिं.स.)। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नांदेड जिल्ह्यातील आमदार अमर राजूरकर यांनी सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नांदेड जिल्ह्यातील विविध विकास कामांबाबत त्यांना सविस्तर निवेदन देऊन चर्चा केली.

72 वर्षांनी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष निवडून आला आहे. तसेच नांदेड जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे संघटन वाढत जात आहे. निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. नांदेड बँकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल आणि राजकीय परिस्थितीबद्दल मुख्यमंत्र्यांना सविस्तर माहिती दिली.

या प्रसंगी नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष, आमदार श्री. तुषार राठोड आणि श्री. दिनकर दहिफळे ,डॉ आशुतोष राजुरकर हे देखील प्रामुख्याने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande