पंढरपूर–शेगाव रेल्वे मार्गासाठी प्रयत्नांना बळ; रेल्वे प्रशासनाशी सविस्तर चर्चा
छत्रपती संभाजीनगर, 19 ऑगस्ट (हिं.स.)। पंढरपूर–शेगाव रेल्वे मार्गासाठी प्रयत्नांना बळ मिळाली असल्याची माहिती धाराशिव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रतापसिंह पाटील यांनी दिली. त्यांनी सांगितले की, पंढरपूर–शेगाव रेल्वे मार्गाच्या संद
अ


छत्रपती संभाजीनगर, 19 ऑगस्ट (हिं.स.)। पंढरपूर–शेगाव रेल्वे मार्गासाठी प्रयत्नांना बळ मिळाली असल्याची माहिती धाराशिव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रतापसिंह पाटील यांनी दिली.

त्यांनी सांगितले की, पंढरपूर–शेगाव रेल्वे मार्गाच्या संदर्भात पुणे येथील शिवाजीनगर रेल्वे भवन येथे राजेश कुमार वर्मा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM), पुणे विभाग, मध्य रेल्वे यांच्या रेल्वे प्रशासनाच्या कार्यालयात भेट देऊन या महत्त्वाकांक्षी रेल्वे मार्गाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.या रेल्वे मार्गामुळे पंढरपूर, भूम, परंडा, वाशी तसेच मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. या महत्त्वपूर्ण मागणीला अधिक बळकटी देण्यासाठी पुढील काळात सातत्याने प्रयत्न करण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार बजरंग बप्पा सोनवणे, खासदार निलेश लंके, खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार विशालजी पाटील तसेच मेघा कुलकर्णी यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले.

यावेळी बीड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष–शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी मस्के यांच्यासह इतर मान्यवर, लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. पंढरपूर–शेगाव रेल्वे मार्ग हा केवळ रेल्वे प्रकल्प नसून मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. या मार्गामुळे प्रवासी वाहतूक, शेतमालाची बाजारपेठांपर्यंत वाहतूक, उद्योग-व्यवसाय, रोजगारनिर्मिती, पर्यटन तसेच धार्मिक स्थळांशी संपर्क यांना मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

-----------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande