
बीड, 19 ऑगस्ट (हिं.स.)। एसपी कार्यालय परिसरातील सिंथेटिक लॉन टेनिस कोर्टला मा. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी भेट देऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी केली.
यावेळी कार्यकारी अभियंता तोंडे तसेच कंत्राटदाराचे प्रतिनिधी आशिष जैन उपस्थित होते. पाहणीदरम्यान पावसामुळे तसेच नालीच्या अतिरिक्त बांधकामामुळे सिंथेटिक पृष्ठभागाच्या काही ठिकाणी क्रॅक पडणे व पृष्ठभाग खचल्याचे निदर्शनास आले.
याबाबत जिल्हाधिकारी यांनी पाऊस थांबल्यानंतर सिंथेटिक कोर्टचे काम दर्जेदार पद्धतीने व आवश्यक तांत्रिक निकषांनुसार तातडीने पूर्ण करून घेण्याच्या सूचना संबंधित कंत्राटदारास दिल्या. तसेच खेळाडू व नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी मैदान परिसरात चेंजिंग रूम व शौचालय उभारण्यासाठी आवश्यक अंदाजपत्रक सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis