जळगाव - डाक अदालत २ सप्टेंबर रोजी; तक्रारी २६ ऑगस्टपर्यंत पाठविण्याचे आवाहन
जळगाव, 19 ऑगस्ट (हिं.स.) पोस्टाच्या सेवांबाबत नागरिकांच्या काही तक्रारी असल्यास त्यांचे योग्य प्रकारे निराकरण करण्यासाठी पोस्ट विभागातर्फे वेळोवेळी डाक अदालत आयोजित करण्यात येते. अधीक्षक डाकघर, जळगाव विभाग, जळगाव यांच्यातर्फे दि. २ सप्टेंबर २०२६ रो
जळगाव - डाक अदालत २ सप्टेंबर रोजी; तक्रारी २६ ऑगस्टपर्यंत पाठविण्याचे आवाहन


जळगाव, 19 ऑगस्ट (हिं.स.) पोस्टाच्या सेवांबाबत नागरिकांच्या काही तक्रारी असल्यास त्यांचे योग्य प्रकारे निराकरण करण्यासाठी पोस्ट विभागातर्फे वेळोवेळी डाक अदालत आयोजित करण्यात येते. अधीक्षक डाकघर, जळगाव विभाग, जळगाव यांच्यातर्फे दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजता त्यांच्या कार्यालयात डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे.

पोस्टाच्या कामासंबंधी ज्या तक्रारींचे सहा आठवड्यांच्या आत निराकरण झालेले नाही किंवा समाधानकारक उत्तर मिळालेले नाही, अशा तक्रारींची डाक अदालतीत दखल घेतली जाणार आहे. विशेषतः टपाल, स्पीड पोस्ट, काउंटर सेवा, डाक वस्तू, पार्सल, बचत बँक, मनीऑर्डर आदी सेवांबाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील.

तक्रारीमध्ये सर्व तपशील नमूद करणे आवश्यक असून, तक्रार कोणत्या तारखेला व कोणत्या अधिकाऱ्याकडे करण्यात आली होती, संबंधित अधिकाऱ्याचे नाव व हुद्दा आदी माहिती नमूद करावी.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande