
अमरावती, 19 ऑगस्ट (हिं.स.)अमरावती-अकोला महामार्गावरील लोणीजवळ मंगळवारी रात्री ट्रक आणि एस-क्रॉस कारची भीषण धडक होऊन शासकीय कंत्राटदार व उद्योजक किशोर काकाणी (वय ५८) यांचा जागीच मृत्यू झालो. धडक एवढी भीषण होती की, कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. अपघातानंतर किशोर काकाणी यांचा मृतदेह कारमध्ये अडकून पडल्याने पोलिसांना तो बाहेर काढण्यासाठी मोठे शर्थीचे प्रयत्न करावे लागले.
अम राबती येथील बियाणी कॉलेज, दसरा मैदानासमोर राहणारे किशोर काकाणी है मूळचे कामरगाव येथील रहिवासी होते, ते पारश्री हॉस्पिटलचे संचालक डॉ. श्रीगोपाल राठी यांचे मेहुणे होते.मंगळवारी रात्रौ साडेआठ वाजताच्या सुमारास ते कामरगाव येथून अम रावतीकडे येत होते. लोणी परिसरातील हटिल संधूजवळ त्यांनी कार उभी केली होती. त्याच वेळी अकोल्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रकने रस्ता दुभाजक ओलांडून त्यांच्या कारला जोरदार धडक दिली.या भीषण अपघातात किशोर काकाणी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताचा मोठा आवाज झाल्याने हॉटेलमधील ग्राहक तसेच मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
घटनेची माहिती लोणी पोलिसांना देण्यात आली. काही वेळातच ठाणेदार सानप यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. ट्रक आणि कार एकमेकांत अडकल्याने किशोर काकाणी यांचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. पोलिसांनी मृतदेह कारमधून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. घटनेची माहिती मिळताच पारश्री हॉस्पिटलचे संचालक डॉ. श्रीगोपाल राठी हेही घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली
किशोर काकाणी यांच्या आकस्मिक निधनाने अमरावती आणि कामरगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ज्येष्ठ आयएएस अधिकारी सुरेश काकाणी यांचे ते लहान भाऊ होते. 'त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले डॉ. प्रतीक व डॉ. शुभम, तीन भाऊ मोहनलाल, द्वारकाप्रसाद व सुरेश, दोन बहिणी सुशीला व डॉ. निर्मल राठी, सुना, नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे.
--------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी