
छत्रपती संभाजीनगर, 19 ऑगस्ट (हिं.स.)।
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने
आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्यावतीने उत्कृष्ट महाविद्यालय, आदर्श प्राचार्य व कार्यक्रमाधिकारी अशा १२ पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. बीड, जालना, धाराशिव व छत्रपती संभाजीनगर या चारही जिल्ह्यांतून प्रत्येकी तीन पारितोषिकांचे वितरण यावेळी करण्यात आले. यामध्ये उत्कृष्ट विस्तार केंद्र पुरस्कार २०२५-२६ १. चिश्तिया महाविद्यालय, खुलताबाद, जि.छत्रपती संभाजीनगर, श्रीमती दानकुंवर महिला महाविद्यालय, जालना, ३. श्री.शंकरराव पाटील महाविद्यालय, भूम, जि.धाराशिव, ४. श्री.सिध्देश्वर महाविद्यालय, माजलगाव, जि.बीड, उत्कृष्ट विस्तार केंद्र प्राचार्य पुरस्कार १. डॉ.आसिफ झकेरिया, २. डॉ.जितेंद्र अहिरराव, डॉ.अनुराधा जगदाळे, ४. डॉ.मुकूंद देवर्षी, उत्कृष्ट विस्तार केंद्र कार्यक्रम अधिकारी पुरस्कार २०२५-२६ १. डॉ.मोहम्मद अली, २. प्रा.पार्वती देशमुख, ३. डॉ.श्यामसुंदर आगे, डॉ.नितीन पडवळ ४. प्रा.सुरेश बनसोडे यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. प्रारंभी वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis