कर्जत विधानसभा मतदारसंघात मतदार यादी पुनरिक्षणाचा पहिला टप्पा पूर्ण
रायगड, 19 ऑगस्ट (हिं.स.)। : भारत निवडणूक आयोगाच्या सखोल मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाचा पहिला टप्पा कर्जत विधानसभा मतदारसंघात 17 ऑगस्ट 2026 रोजी पूर्ण झाला आहे. याबाबत उपविभागीय अधिकारी, कर्जत यांनी माहिती दिली. सखोल मतदार यादी पुनरिक्षणापूर्वी
First-phase-of-voter-list-revi


रायगड, 19 ऑगस्ट (हिं.स.)। : भारत निवडणूक आयोगाच्या सखोल मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाचा पहिला टप्पा कर्जत विधानसभा मतदारसंघात 17 ऑगस्ट 2026 रोजी पूर्ण झाला आहे. याबाबत उपविभागीय अधिकारी, कर्जत यांनी माहिती दिली.

सखोल मतदार यादी पुनरिक्षणापूर्वी कर्जत विधानसभा मतदारसंघात एकूण 3 लाख 19 हजार 337 मतदार होते. त्यापैकी 2 लाख 57 हजार 452 मतदारांचे गणना प्रपत्र भरून प्राप्त झाले, तर 61 हजार 885 गणना प्रपत्रे अद्याप प्राप्त झालेली नाहीत. प्राप्त गणना प्रपत्रांपैकी 1 लाख 3 हजार 450 मतदारांची सेल्फ मॅपिंग करण्यात आली आहे. त्यापैकी ऑफलाइन पद्धतीने 2 लाख 56 हजार 244 गणना पत्रके प्राप्त झाली असून, ऑनलाइन पद्धतीने 1 हजार 208 गणना पत्रके प्राप्त झाली आहेत. प्रोव्हिजनल मॅपिंग केलेल्या मतदारांची संख्या 1 लाख 38 हजार 98, तर मॅपिंग न झालेल्या मतदारांची संख्या 15 हजार 904 आहे.

पुनरिक्षणाच्या प्रक्रियेत 19 हजार 849 मतदार मृत, 27 हजार 374 मतदार कायमस्वरूपी स्थलांतरित, 8 हजार 706 मतदार दुबार आणि 5 हजार 848 मतदार अनट्रेसेबल असल्याची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय इतर कारणांमुळे 108 मतदारांची नोंद झाली आहे.

दरम्यान, 85 वर्षांवरील ज्येष्ठ मतदारांचीही माहिती संकलित करण्यात आली असून, DSE, PSE आणि इतर वर्गवारीनुसार मतदारांची पडताळणी करण्यात आली आहे. महत्त्वाच्या तारखा: प्रारूप मतदार यादी 24 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध होणार आहे. दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी 24 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर 2026 असा आहे. दावे व हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया 24 ऑगस्ट ते 22 ऑक्टोबर 2026 दरम्यान होणार असून, अंतिम मतदार यादी 27 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande