नांदेड : जुन्या मोंढ्यात सी.सी. रोडचे लोकार्पण
नांदेड, 19 ऑगस्ट (हिं.स.)। नांदेड-वाघाळा महानगरपालिका हद्दीतील जुन्या मोंढा परिसरात आमदार स्थानिक विकास निधीतून उभारण्यात आलेल्या सी.सी. रोडचे लोकार्पण शिवसेना आमदार आनंद याबोंढारकर यांच्या हस्ते करण्यात आले. मुंदडा यांच्या घरापासून श्रावणलाल गवळी
अ


नांदेड, 19 ऑगस्ट (हिं.स.)। नांदेड-वाघाळा महानगरपालिका हद्दीतील जुन्या मोंढा परिसरात आमदार स्थानिक विकास निधीतून उभारण्यात आलेल्या सी.सी. रोडचे लोकार्पण शिवसेना आमदार आनंद याबोंढारकर यांच्या हस्ते करण्यात आले.

मुंदडा यांच्या घरापासून श्रावणलाल गवळी यांच्या घरापर्यंत हा रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्यामुळे परिसरातील नागरिकांची वाहतूक अधिक सुलभ होऊन दैनंदिन ये-जा करण्याची मोठी सोय होणार आहे.

यावेळी बोलताना आमदार आनंद याबोंढारकर यांनी नागरिकांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देत परिसराच्या विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचे सांगितले. स्थानिक नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन विकासकामांना प्राधान्य दिले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.

लोकार्पण सोहळ्यास शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

------------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande