जनहितासाठी सातत्याने काम करणे हीच लोकप्रतिनिधींची खरी जबाबदारी : आ. आनंद बोंढारकर
नांदेड, 19 ऑगस्ट (हिं.स.)। जनतेचा विश्वास कायम राखत त्यांच्या हितासाठी सातत्याने काम करणे, हीच लोकप्रतिनिधी म्हणून खरी जबाबदारी असल्याचे मत शिवसेना आमदार आनंद बोंढारकर यांनी व्यक्त केले. नांदेड येथील शिवनेरी जनसंपर्क कार्यालयात नागरिकांशी संवाद सा
जनहितासाठी सातत्याने काम करणे हीच लोकप्रतिनिधींची खरी जबाबदारी : आ. आनंद बोंढारकर


नांदेड, 19 ऑगस्ट (हिं.स.)। जनतेचा विश्वास कायम राखत त्यांच्या हितासाठी सातत्याने काम करणे, हीच लोकप्रतिनिधी म्हणून खरी जबाबदारी असल्याचे मत शिवसेना आमदार आनंद बोंढारकर यांनी व्यक्त केले.

नांदेड येथील शिवनेरी जनसंपर्क कार्यालयात नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी मतदारसंघातील विविध भागांतून आलेल्या नागरिकांच्या अडचणी, समस्या आणि अपेक्षा त्यांनी जाणून घेतल्या. नागरिकांनी मांडलेल्या विविध प्रश्नांवर संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

नांदेड जिल्ह्यातील जनतेच्या विविध प्रश्नांची उकल करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असल्याचे आमदार बोंढारकर यांनी सांगितले. नागरिकांच्या समस्या केवळ ऐकून न घेता त्यावर योग्य तोडगा काढण्यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जनसंपर्क कार्यालयात झालेल्या या भेटीदरम्यान नागरिकांनी विविध प्रश्न मांडले. त्यावर आमदार बोंढारकर यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देत प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande