आवश्यक निधीची तरतूद करण्याची आ. संदीप क्षीरसागर यांची शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे मागणी
बीड, 19 ऑगस्ट (हिं.स.)। राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन बीड विधानसभा मतदारसंघातील विविध रस्ते विकासकामांसाठी आवश्यक निधीची तरतूद करण्याची मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली. बीड मतदारसंघातील ग्रामीण तसे
शिवेंद्रसिंहराजे भोसले


बीड, 19 ऑगस्ट (हिं.स.)।

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन बीड विधानसभा मतदारसंघातील विविध रस्ते विकासकामांसाठी आवश्यक निधीची तरतूद करण्याची मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली. बीड मतदारसंघातील ग्रामीण तसेच शहरी भागातील रस्त्यांची कामे मार्गी लागणे, नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुलभ होणे आणि दळणवळणाची सुविधा मजबूत होणे, यासाठी शासनस्तरावर आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत मंत्री महोदयांशी सविस्तर चर्चा केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande