
बीड, 19 ऑगस्ट (हिं.स.)।
तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत विकास निधी मिळावा, तसेच बीड विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील विविध प्रलंबित विकासकामांसाठी विशेष निधी मंजूर करावा, या मागणीसाठी आमदार संदीप क्षीरसागर यांनी आज राज्याचे ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेत प्रस्ताव सादर केला.
ग्रामीण भागातील नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि प्रलंबित विकासकामे तातडीने मार्गी लावण्याची आग्रही मागणी आमदार क्षीरसागर यांनी मंत्री महोदयांकडे केली.
यावेळी जयकुमार गोरे यांनी सकारात्मक भूमिका घेत आवश्यक मंजुरीसाठी लवकरच कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis