थकीत कर्जदार मयत शेतकऱ्यांच्या वारसांना कर्जमुक्तीचा लाभ देण्याची विनंती
छत्रपती संभाजीनगर, 19 ऑगस्ट (हिं.स.)। शासनाने सन 2026 मध्ये राज्यातील शेतकऱ्यांसाठी ''पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना'' जाहीर केली. मात्र काही थकीत कर्जदार शेतकरी मयत झाले असल्याने सदरील शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसल्याने कर्
अ


छत्रपती संभाजीनगर, 19 ऑगस्ट (हिं.स.)।

शासनाने सन 2026 मध्ये राज्यातील शेतकऱ्यांसाठी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' जाहीर केली. मात्र काही थकीत कर्जदार शेतकरी मयत झाले असल्याने सदरील शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसल्याने कर्जदार शेतकऱ्यांच्या 7/12 उताऱ्यावर कर्जाचा बोजा दिसणार आहे.

त्यामुळे जे कर्जदार शेतकरी मयत झाले आहेत परंतु त्यांच्याकडे फार्मर आयडी नसल्याने त्यांच्या वारसांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, अशी विनंती आमदार सतीश चव्हाण यांनी सहकार मंत्री महोदयांकडे केली.

याप्रसंगी श्री. दिलीप बनकर, श्री. राजेश्वर चव्हाण, श्री. गोविंद देशमुख, श्री. महेश उबाळे आदींची उपस्थिती होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande