
छत्रपती संभाजीनगर, 19 ऑगस्ट (हिं.स.)।
जायकवाडी टप्पा–२ला मंजुरी; मराठवाड्याच्या विकासाला नवी दिशा मिळाली असल्याचे आमदार विलास भुमरे यांनी सांगितले. जायकवाडी प्रकल्प टप्पा–२ साठी ₹६,४७७ कोटी ८८ लाखांच्या आर्थिक तरतुदीस मंजुरी मिळाल्याने मराठवाड्याच्या सिंचन विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
या प्रकल्पामुळे छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, परभणी आणि नांदेड या पाच जिल्ह्यांतील सुमारे १ लाख ३१ हजार ६५२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. माजलगाव धरणाच्या कामाला गती मिळण्यासोबतच शेती, औद्योगिक पाणीपुरवठा, मत्स्य व्यवसाय आणि विद्युत निर्मितीलाही फायदा होणार आहे.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis