रेशीमला ८४ हजारांचा भाव मिळवून मानमोडे बंधूंनी रचला विक्रम
- ऋषिकेश कराड यांच्याकडून मानमोडे बंधूंचा सत्कार लातूर, 19 ऑगस्ट (हिं.स.) : रेशीम कोष उत्पादन व्यवसायाकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असताना रेणापूर तालुक्यातील खरोळा येथील रेशीम कोष उत्पादक शेतकरी बालाजी मानमोडे आणि दत्ता मानमोडे यांच्या रेशीम कोषाला सोल
सत्कार


- ऋषिकेश कराड यांच्याकडून मानमोडे बंधूंचा सत्कार

लातूर, 19 ऑगस्ट (हिं.स.) : रेशीम कोष उत्पादन व्यवसायाकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असताना रेणापूर तालुक्यातील खरोळा येथील रेशीम कोष उत्पादक शेतकरी बालाजी मानमोडे आणि दत्ता मानमोडे यांच्या रेशीम कोषाला सोलापूर बाजारपेठेत प्रतिक्विंटल तब्बल ८४ हजार रुपयांचा भाव मिळाला. हा भाव राज्यातील सर्वाधिक असल्याने भाजपाचे युवा नेते तथा कौशल्य सिल्कचे प्रकल्प संचालक ऋषिकेश कराड यांनी मानमोडे बंधूंचा सत्कार करून अभिनंदन केले.

कमी खर्चात आणि कमी कालावधीत उत्पन्न मिळत असल्याने गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांचा रेशीम कोष उत्पादनाकडे कल वाढला आहे. खरोळा येथील बालाजी मानमोडे आणि दत्ता मानमोडे हे नियमितपणे रेशीम कोष उत्पादन करतात. त्यांच्या उच्च दर्जाच्या रेशीम कोषाला सोलापूर बाजारपेठेत ८४ हजार रुपये प्रतिक्विंटल असा विक्रमी भाव मिळाला.

एक एकर क्षेत्रातील तुती लागवडीतून अवघ्या दीड महिन्यात २ लाख ४५ हजार रुपयांचे उत्पादन मिळाले आहे. उच्च दर्जाच्या रेशीम कोषामुळे मानमोडे बंधूंना हा विक्रमी भाव मिळाल्याचे सांगण्यात आले. मिळालेला भाव रेशीम कोष उत्पादन करणाऱ्या इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे ऋषिकेश कराड यांनी सांगितले.

यावेळी महेंद्र गोडभरले, अमर चव्हाण, रमाकांत फुलारी, चंद्रकांत कातळे, हनुमंत राऊतराव, प्रताप राऊतराव, पुंडलिक अदुडे, बाळू गौंड, मुस्तफा तशेवाले, धर्मराज मानमोडे, राजू कांबळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande