
छत्रपती संभाजीनगर, 19 ऑगस्ट (हिं.स.)।
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र अभ्यास मंडळ व मौलाना आझाद महाविद्यालयात यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे आढावा बैठक घेण्यात आली. नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे अभ्यासक्रमाची रचनेविषयी मार्गदर्शन तसेच प्राचार्य डॉ.मजहर फारुकी यांच्या सेवा निवृत्तीनिमित्त गौरव करण्यात आला.
कार्यक्रमात विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. भास्कर साठे, प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. सुनीता बोर्डे, 'आयक्यूएसी'चे संचालक डॉ. गुलाब खेडकर यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीत नवीन शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या पार्श्वभुमीवर दिवसभर मंथन करण्यात आले. प्राचार्य डॉ.मजहर फारुकी अध्यक्षस्थानी होते. अभ्यास मंडळाच्या सदस्य तसेच प्राणीशास्त्र विषयातील सर्व प्राध्याकांच्या वतीने दुपारच्या सत्रात प्राचार्य डॉ.मजहर फारुकी यांना मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis